शिवसेना प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न!
(सांगोल्याचे पाणीदार आमदार अँड शहाजी बापू पाटील यांची प्रमुख उपस्थिती)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर येणार होते. मात्र या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले असल्याने ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाही .
उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. शिंदे गटातील शहाजी पाटील हेही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रवक्त्या प्रा.डॉ.ज्योती वाघमारे यांच्या जग जीवनराम वस्ती परिसरातील जय शंकर तालीम येथे संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा त्यांच्या डोळ्यांच्या आजारांमुळे अचानक रद्द झाला. तसा निरोप राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांना मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक यांच्याकडून फोन द्वारे निरोप मिळाला. मुख्यमंत्री येणार असल्याने जय शंकर तालीम येथे जोरदार तयारी केली होती.
जोरदार आतषबाजी होणार होती. अचानक मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने जय शंकर तालीम परिसरातील नागरिक व शिवसैनिक यांच्यामध्ये निराशा दिसून आली मात्र सांगोल्याचे विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील हे मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. आ.शहाजी बापूंच्या हस्ते प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे व तमाम शिवसैनिक उपस्थित होते.
आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करत ज्योतीताई या महाराष्ट्राच्या रणरागिणी आहेत. शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ आहेत. सोलापूर शहर जिल्हा राज्यात ज्योती ताईंचा विशेष प्रभाव आहे. महिलांच्या न्याय हक्कासाठी ताई अहोरात्र झटत असतात. त्यांच्या प्रत्येक कार्यात आपण व मुख्यमंत्री एकनाथ भाई तसेच सर्व शिवसैनिक पाठीशी एक भाऊ म्हणून खंबीरपणे उभे आहोत आणि राहू अशी ग्वाही दिली.