आमदार शहाजीबापूंच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन
रस्त्यासह बहुउद्देशीय सभागृह, सभामंडप बांधकामाचा शुभारंभ
सांगोला तालुक्यातील जुनोनी ते तिप्पेहळ्ळी आणि किडबिसरी ते नागज या ३ कोटी ३० लाख रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. सांगोला शहरातील २५ लाख रु. खर्चाच्या कोपटे वस्ती येथे गणपती मंदिराजवळ बहुउद्देशीय सभागृह बांधकामाचे लोकार्पण आणि २५ लाख रुपये खर्चाच्या जुना सावे रोड मणेरी मळा येथील पठाण बाबा दर्गा येथे सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील उपस्थित होते.
सांगोला तालुक्यातील जुनोनी रा. मा. ३८७ ते तिप्पेहळ्ळी आणि किडबिसरी ते नागज (जिल्हा हद्दीपर्यंत) प्रजिमा-१६४ या रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी ३ कोटी ३० लाख ५८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील लोकांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मंजूर निधीमधून २५ लाख रु. खर्चाच्या सांगोला येथील कोपटे वस्ती येथील गणपती मंदिराजवळ बहुउद्देशीय सभागृह बांधकामाचे लोकार्पण आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जुना सावे रोड मणेरी मळा येथील २५ लाख रुपये खर्चाच्या पठाण बाबा दर्गा येथे सभा मंडप बांधकामाचे भूमिपूजन आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दीपकआबा साळंखे-पाटील होते. यावेळी माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी, माजी नगराध्यक्षा राणी माने, माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, माजी नगरसेवक सचिन लोखंडे, माजी नगरसेविका छाया मेटकरी, माजी नगरसेविका अप्सरा ठोकळे, शिवसेना शहरप्रमुख समीर पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.