श्री शंकर सहकारीची ऊसाच्या पहिल्या हप्त्यामध्ये गत हंगामाच्या तुलनेत रक्कम रु १५० प्रती मे टना ची विक्रमी व भरघोस वाढ
श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर *सन 2024-25* गळीत हंगामासाठी गाळपास आलेल्या ऊस बिलाचा *पहिला हप्ता रक्कम रू 2750/- प्रति मे टन* प्रमाणे तसेच बिगर ऍडव्हान्स तोडणी वाहतुकीची पहिल्या मस्टर ची बिले दिनांक 10/12/2024 रोजी सभासद,ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूक कंत्राटदारांच्या बँक खात्यावर वर्ग होणार असलेची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन ऍड. मिलिंद कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. कारखान्याचे चेअरमन आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार गाळपास आलेल्या ऊसाची बिले,बिगर ऍडव्हानस तोडणी वाहतुकीची बिले अदा करणेची वचनपूर्ती कारखान्याच्या व्यवस्थानाकडून केली जात असलेचे यावेळी बोलताना श्री कुलकर्णी यांनी सांगितले. सभासद व ऊस उत्पादकांनी आमदार श्री रणजितसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्वावर कायम विश्वास दाखवून ऊस पुरवठा कारखान्यास केला आहे.सभासद, ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त ऊस दर देण्यासाठी व अडचणीच्या परिस्थितीमध्ये व्यवस्थापन नेहमीच सभासद, ऊस उत्पादकांच्या पाठीशी खंबीर पणे उभे असलेचे व्यवस्थापनाने दाखवून दिले असून चालू गळीत हंगामामध्ये कारखान्याने 3.50 लाख मे टन गाळपाचे उद्धिष्ट निर्धारित केले असून सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कारखान्याकडे गाळपास पाठविणेचे आवाहन श्री कुलकर्णी यांनी यावेळी केले.