कासेगाव येथे विचारविनिमय बैठकीत वसंतनाना देशमुख यांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी समर्थकांची मागणी!
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या उमेदवारीसाठी शरद पवारांना भेटून मागणी करणार : वसंतनाना देशमुख
आगामी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढवावी अशी मागणी वारंवार कार्यकर्त्यांकडून होत असल्याने आपण विचार विनिमय बैठकीच्या माध्यमातून समर्थकांचा निर्णय घेतला असून लवकरच शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी करणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते वसंतनाना देशमुख यांनी दिली.
पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हॉइस चेअरमन तथा कासेगाव जिल्हा परिषद गटाचे विद्यमान सदस्य वसंतनाना देशमुख यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची निवडणूक लढवण्याबाबत चाचपणी करण्यासाठी कासेगाव येथे विचारविनिमय बैठकीचे आयोजन करून कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतली.
यावेळी वसंतनाना देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि दिग्गज नेते मंडळींनी निवडणूक लढवावी अशी आग्रही भूमिका मांडली.
यावेळी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील दिग्गज नेतेमंडळींनी त्यांना पाठिंबा दिला.या विचार विनिमय बैठकीच्या निमित्ताने देशमुख यांनी विधानसभेची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.
यावेळी व्यासपीठावर माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, दीपक वाडदेकर, नगरसेवक सुरेश नेहतराव, महंमद वस्ताद यांच्यासह पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील राजाभाऊ कडलासकर, नाथा काशीद, सुशांत माने, विठ्ठल झांजे, शिवाजी कोळेकर, नागेश कस्तुरे, इरेश जोंधळे ,संजय राठोड, आबा हंडे, संतोष माने, अण्णा पाटील, शरद गावडे मंगळवेढा तालुक्यातील सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सोसायटीचे चेअरमन ग्रामपंचायत सदस्य वअनेक नेते मंडळी तसेच वसंत नाना देशमुख प्रेमी कार्यकर्ते व कासेगाव येथील ग्रामस्थ ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.