दिनांक २६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक:- उमेश दादा पाटील
(जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीला आले महत्त्व)
(सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी या बैठकीसाठी मोठ्या संख्येने हजर राहण्याची केले जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील यांनी आवाहन)
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सोलापूर जिल्ह्याची महत्त्वपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बैठक शुक्रवार दि. 26 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा सावली निवास,मोहोळ येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिली आहे.
या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती, संघटनात्मक मजबुती, बूथ पातळीवरील तयारी, तसेच कार्यकर्त्यांची जबाबदारी व इच्छुक उमेदवार यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
याच बैठकीदरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारासाठी मागणी अर्ज उपलब्ध केले जाणार आहेत.
यामध्ये जिल्हा परिषद पुरुष उमेदवारासाठी 2000 रू महिला व राखीव उमेदवारांना 1000 रु तसेच पंचायत समिती इच्छुक उमेदवारासाठी 1000 रू व महिला व राखीव जागेसाठी 500 असे अर्जशुल्क असेल.त्यामुळे निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह या बैठकीस उपस्थित राहावे,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर बैठकीस सोलापूर जिल्ह्याचे जेष्ठ नेते बळीराम काका साठे,माजी आमदार संजय मामा शिंदे,प्रदेश प्रतिनिधी मा कल्याणराव काळे,कौशिक तात्या गायकवाड,लतिफ भाई तांबोळी, बाळासाहेब बंडगर,रामेश्वर मासाळ यांच्या सह प्रमुख जिल्हा कार्यकारिणी सदस्य,तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष, विभागीय पदाधिकारी तसेच पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
बैठकीसाठी तालुका निहाय्य वेळापत्रक
माढा : सकाळी 10:00 वाजता
दक्षिण सोलापूर : सकाळी 10:30 वाजता
उत्तर सोलापूर : सकाळी 11:00 वाजता
पंढरपूर : सकाळी 11:30 वाजता
करमाळा : दुपारी 12:00 वाजता
अक्कलकोट : दुपारी 12:30 वाजता
मंगळवेढा : दुपारी 01:00 वाजता
बार्शी : दुपारी 01:30 वाजता
सांगोला : दुपारी 02 : 00 वाजता
मोहोळ : दुपारी 02: 30 वाजता
माळशिरस : दुपारी 03:00 वाजता
या प्रमाणे सर्व तालुक्यातील पदाधिकारी यांच्या बैठका पार पडतील.सदर बैठकीसाठी सर्व तालुका कार्यकारीणी,जिल्हा कार्यकारिणी,प्रदेश पदाधिकारी,सर्व फ्रंटल व सेलचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणे अपेक्षित आहे.
