मोहोळ विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील १७ गावातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!
(पंढरपूर तालुक्यातील त्या १७ गावातील अखेरचा निर्णय खा. धनंजय महाडिक घेणार:-भाजपा संघटन प्रमुख लिंगराज शेंडगे)
247/मोहोळ विधानसभा अंतर्गत पंढरपूर तालुक्यातील १७ गावातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व बूथ प्रमुख,सुपर वारियर्स,विविध मोर्चाचे पदाधिकारी यांची पुळूज ता.पंढरपूर येथे बैठक पार पडली.
२४७/मोहोळ विधानसभा मधून महायुतीचे अजित पवार गटाचे विदमान आमदार यशवंत तात्या माने यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित करण्यात आली आहे.
परंतु त्यांच्या उमेदवारीला पंढरपूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी च्या १७ गावच्या जनतेमधून व पदाधिकाऱ्यांतुन प्रचंड विरोध आहे…
यावेळी भाजयुमो चे जिल्हा उपाध्यक्ष तथा १७ गावचे भाजपचे संघटनप्रमुख लिंगराज शेंडगे व सर्व पदाधिकारी यांनी बोलताना सांगितले की भारतीय जनता पक्षाची ताकद या मतदार संघात खुप मजबूत आहे,
गेल्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अगदी थोड्या ४ हजार मतांनी आमचा निसटता पराभव झाला होता.
यावेळी तर “अप्पर तहसिल कार्यालयावरून” त्यांच्या विरोधात जनतेमध्ये प्रंचड रोष आहे…
आत्ताच झालेल्या लोकसभेत राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी भाजपचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार मा.श्री. राम सातपुते यांचे काम प्रामाणिकपणे कोणीही केलेले नाही व निधी वाटपात कोणत्याच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना विचारत घेतले जात नाही
यासाठी आम्ही येत्या काळात भाजपचे राज्यसभा खासदार माननीय श्री धनंजय महाडिक साहेब यांच्या माध्यमातून आमचे नेते तथा महाराष्ट्र भाजपचे प्रमुख उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस साहेब व प्रदेश अध्यक्ष मा श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याशी भेट घेणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले
यावेळी,आंबेचिचोलीचे काका यादव,आंबेचे भाजयुमो चे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे, फुलचिंचोलीचे श्याम गोडसे,विटे गावचे बंडू गडदे,तारापूर चे कौस्तुभ डोळे, खरसोळीचे सरंपच दिगंबर कांबळे, पुळूजवाडीचे अक्षय मदने, यावेळी १७ गावातील भाजपाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.