दाखला देण्यास दिरंगाई झाल्यास माझ्याशी थेट संपर्क साधा!
(रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते भूताष्टे येथे कुणबी दाखल्यांचे केले वाटप)
कुणबी व एस ई बी सी चे धाकले मिळण्यामध्ये तत्पर दिरंगाई अथवा प्रशासकीय पातळीवरून दिरंगाई होत असल्यास व नाहक त्रास होत असल्यास थेट माझ्याशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी जनतेला केले.
माढा तालुक्यातील भूताष्टे येथील विद्यार्थ्यांना कुणबी व एस ई बी सी चे दाखले वाटप करण्यात आले आहे यावेळी रणजितसिंह शिंदे बोलताना म्हणाले की सध्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेचे दिवस सुरू असून विद्यार्थ्यांना जातीची दाखले मिळण्यामध्ये काही ठिकाणी प्रशासकीय पातळीवर दिरंगाई होत होऊ शकते, आडचणी येऊ शकतात अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यात काही अडचणी आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.
यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक शंभूराजे मोरे,शहाजी यादव, शिरीष पाटील, बाळासाहेब व्यवहारे, नागनाथ माळी, भास्कर यादव, विजय यादव,दिलीप यादव, श
सुरेश यादव, सुधीर यादव, अनिल यादव, मिलिंद भोसले यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.