
*हृदय प्रत्यारोपण यशस्वी शस्त्रक्रिये नंतर बबनदादा शिंदे यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज*
*(०२ महिने अमेरिकेतच राहणार*
*५ऑक्टोबरला रणजित भैय्या शिंदे भारतात परतणार!)*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
अमेरिकेमध्ये सेंट लुईस शहरातील बी.जे.सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले माढा तालुक्याचे भाग्यविधाते आ. बबनदादा शिंदे यांना हार्ट ट्रान्सप्लांटेशनच्या (हृदय प्रत्यारोपण) यशस्वी शस्त्रक्रियेनंतर डिस्चार्ज मिळाला असून बबन दादांना हॉस्पिटल पासून जवळच सोयीस्कर असलेल्या स्पेशल निवासस्थानी विश्रांती व पुढील औषधोपचारासाठी ठेवण्यात आले आहे .
टेंभुर्णी येथील डॉक्टर ए एस पावले व सौ. हेमलता पावले यांचे चिरंजीव व अमेरिकेतील प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अमित पावले यांनी १८ ऑगस्ट २०२५ रोजी सेंट लुईस येथील बीजेसी हॉस्पिटलमध्ये बबन दादांच्यावर( हृदय प्रत्यारोपण) हार्ट ट्रान्सप्लांटेशनची शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली व तेव्हापासून दादा हॉस्पिटलमध्येच उपचार घेत आहेत व सध्या त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आणखीन दोन महिन्यांनी आदरणीय दादा निमगाव टे. येथे आपल्या मायभूमीत चांगले बरे होऊन परत येणार आहेत, काळजी करण्यासारखे कांहीही नाही असेही डॉक्टर पावले यांनी आवर्जून सांगितले. हृदयरोग तज्ञ डॉक्टर अमित पावले दादांची नियमित तपासणी करून , त्यांच्या औषध उपचाराकडे लक्ष देत आहेत .
बबनदादांचे सुपुत्र रणजीत भैय्या शिंदे व दादांच्या बरोबर कायम सेवेसाठी तत्पर असलेले त्यांचे स्वीय सहाय्यक रवींद्र उर्फ बापू शिंदे हे दादांची व्यवस्थित काळजी घेत आहेत. दादांच्या धर्मपत्नी सौ सुनंदाताई बबनराव शिंदे व माढा तालुक्याचे माजी उपसभापती माननीय दादासाहेब तरंगे हे देखील अमेरिकेत दादांच्या बरोबर आहेत.
5 ऑक्टोबर रोजी रणजीत शिंदे येणार*
(अमेरिकेत हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिये नंतर बबन दादांची प्रकृती सुधारत असून त्यांना हॉस्पिटल मधून* *डिस्चार्ज मिळाला आहे आदरणीय रणजीतभैय्या शिंदे हे ०४ऑक्टोबर २०२५ रोजी भारतात येण्यासाठी निघणार आहेत व ०५ ऑक्टोबर रोजी निमगाव टे येथे येणार आहेत. आदरणीय बबनदादा शिंदे हे मात्र व्यवस्थित बरे होऊन ०२ महिन्यानंतर भारतात परत येणार असल्याची अधिकृत माहिती आहे.
