विठ्ठलराव शिंदे कामगार पतसंस्थेमार्फत मयत कामगारांचे कुंटूंबियास अडीच लाखाची आर्थिक मदत
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना कामगार पतसंस्थे मार्फत मयत कामगार दत्तात्रय मुरलीधर लोंढे रा.निमगांव टे यांचे कुंटूंबियास अडीच लाखाची आर्थिक मदत देणेत आली. या मदत निधीचा धनादेश कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांचे हस्ते लोंढे यांचे कुंटूंबियास सुपूर्द करणेत आला.
अधिक माहीती अशी की, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे कामगारांसाठी आ.बबनराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना सेवक पतसंस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. या पतसंस्थेमार्फत कारखान्याचे कामगारांना मध्यम मुदत कर्ज माफक व्याजदरात उपलब्ध करून देण्यात येत आहे. या पतसंस्थेच्या माध्यमातून कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविणेत येत आहेत. यामध्ये कामगार व त्यांचे कुंटूंबियाना दुर्धर आजार झाल्यास दोन लाख रूपयांची आर्थिक मदत देणेत येत आहे. तसेच कामगार मयत झालेस त्यांचे कुंटूंबियांना अडीच लाख रूपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. पतसंस्थेच्या स्थापनेपासून आजअखेर पतसंस्थेमार्फत कामगारांना एक कोटी छत्तीस हजाराची आर्थिक मदत देण्यात आलेली आहे. मयत कामगार दत्तात्रय मुरलीधर लोंढे रा.निमगांव टे यांचा कॅन्सर या दुर्धर आजाराने निधन झाल्याने त्यांचे कुंटूंबियास पतसंस्थेच्या धोरणानुसार अडीच लाख रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली. तसेच त्यांना यापूर्वी कॅन्सर आजाराचे उपचारासाठी दोन लाख रूपयांची आर्थिक मदत देण्यात आलेली आहे.
सदरप्रसंगी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आ.बबनराव शिंदे, व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, कार्यकारी संचालक तथा पतसंस्थेचे चेअरमन संतोष डिग्रजे, व्हाईस चेअरमन संभाजी थिटे, संचालक अनिल जगताप, दिलीप लव्हटे,पांडूरंग बागल, संजय कैचे, रमेश खेडकर, बालाजी गिड्डे,तानाजी लोंढे,शशिकांत पवार, सुनिल शिंदे,नानासो डुबल,रामचंद्र डांगे,पांडूरंग लोंढे,शरद वाघमारे,तानाजी व्हनमाने, शहाजी गोसावी व पतसंस्थेचे सचिव उत्तम माळवदकर हे उपस्थित होते.