
फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाच्या कामास अखेर सुरुवात!
(पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्यासाठी लवकरच नवीन रेल्वे मार्ग तयार होण्याचा मार्ग झाला सुकर)
बऱ्याच वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या त्याचबरोबर पंढरपूर वरून थेट पुण्याला जाण्यासाठी सोयीस्कर ठरणाऱ्या सातारा जिल्ह्यातील व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील फलटण पंढरपूर रेल्वे मार्गाच्या कामास अखेर सुरुवात झाली असून या कामाचे सर्वेक्षण होऊन शेतजमिनी संपादनाची प्रक्रिया संपूर्ण या दोन्ही तिन्ही तालुक्यांमध्ये सुरू झाली आहे. माळशिरस तालुक्यातील येळीव येथे मोजणी सर्वेक्षण तलाठी अधिकाऱ्यांसमवेत सुरू असून प्राथमिक यासाठी रोड टाकण्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याची यावरून दिसत आहे.
या कामाची सुरुवात झाल्यामुळे सर्व रेल्वे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण असून यामुळे फलटण व माळशिरस तालुक्यातील एकंदरीत या रेल्वे प्रकल्पामुळे विकासाची गती मिळणार असून हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर सुरू व्हावा व पुणे जिल्ह्याबरोबरच सातारा व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अनेकांना या रेल्वेने पंढरीच्या पांडुरंगास दर्शनाला जाण्याची सोय होईल. असे दिसत असून यासाठी सर्वच राजकीय नेते मंडळींनी केलेले प्रयत्न कामी आल्याचे माळशिरस तालुक्यातील जनतेमधून बोलले जात आहे..
