द्विवार्षिक विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर; 12 जुलैला मतदान अन् मतमोजणी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार १२ जुलै रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी मजमोजणीही पार पडेल. विधानसभा आमदारांनी निवडून दिलेल्या विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ येत्या २७ जुलै रोजी संपत असल्यानं ही निवडणूक जाहीर झाली आहे.
ही द्विवार्षिक निवडणूक आहे, कारण दर दोन वर्षांनी यातील सदस्य बदलत जातात.
कुठले सदस्य होताहेत निवृत्त?
डॉ. मनिषा कायंदे
विजय गिरकर
अब्दुल्ला खान दुरानी
निलय नाईक
अॅड. अनिल परब
रमेश पाटील
रामराव पाटील
डॉ. वजहत मिर्झा
डॉ. प्रज्ञा सातव
महादेव जानकर
जयंत पाटील
निवडणुकीचा असा असेल कार्यक्रम
नोटिफिकेशन – मंगळवार, २५ जून २०२४
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – मंगळवार, २ जुलै २०२४
उमेदवारी अर्जांची छाननी – बुधवार, ३ जुलै २०२४
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – शुक्रवार, ५ जुलै २०२४
निवडणूक दिनांक – शुक्रवार १२ जुलै २०२४
मतदानाची वेळ – सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
मतमोजणी – शुक्रवार, १२ जुलै २०२४. संध्याकाळी ५ वाजता.
निवडणूक कार्यक्रम पूर्ण होण्याचा दिनांक – मंगळवार, १६ जुलै २०२४