विधान परिषदेसाठी जिल्हाध्यक्ष शिक्षकांना चव्हाण यांचे नाव आघाडीवर!
(मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे, यांचे विश्वासू सहकारी म्हणून शशिकांत नानांची ओळख)
नगरपरिषद,नगरपालिका, सोलापूर महानगरपालिका व जिल्हा परिषदेत भारतीय जनता पार्टीने जोरदार कमबॅक केल्यामुळे जिल्ह्यात भाजप ताकदवान झाला. अशा वेळी सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांचेही नाव चर्चेत आले असुन त्यांनीही भाजपची ग्रामीण भागात कार्यकर्त्यांची चांगली मोट बांधली आहे.. विशेषता त्यांनी मोहोळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या चांगल्या जागा निवडून आणल्यामुळे त्यांच्या नावाची वरिष्ठ स्तरावरून चर्चा होत असून नाना चव्हाण यांना उमेदवारी दिली तर भाजपची अजुन चांगली ताकद वाढणार आहे.
नवा की जुना असणार याविषयी जिल्ह्यात सध्या चर्चा सुरू आहे. यात भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या रूपाने आणखीन एका नव्या नावाची भर पडली.
सोलापूरच्या विधान परिषदेच्या जागेची मुदत २०२२ ला संपली. राज्यामध्ये त्यावेळी ज्या जागेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला सोलापूरच्या जागेसाठी पुरेसे मतदार नसल्याच्या कारणावरून निवडणूक पुढे ढकलण्यात आली. त्याला अद्याप मुहूर्त मिळाला नाही. मात्र, नुकत्याच नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यामुळे विधान परिषदेचा सदस्य होण्यासाठी आवश्यक असणारे मतदार उपलब्ध झाले. अशा परिस्थितीत जिल्ह्यातून अनेकांची नावे चर्चेत येऊ लागली.
त्यामध्ये राजेंद्र राऊत, प्रशांत परिचारक, राम सातपुते, दिलीप माने, राजन पाटील, अशा अनेक दिग्गज नावे सध्या चर्चेत येत असताना भाजप ग्रामीणचे अध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या नावाची देखील यामध्ये भर पडली. शशिकांत चव्हाण यांचा प्रवास हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ते जिल्हाध्यक्ष असा झाला. पक्ष बांधणीमध्ये बूथ प्रमुख, गटप्रमुख, पन्ना प्रमुख अशा अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे ज्या पद्धतीने पक्षाने जिल्हाध्यक्ष निवडताना धक्कादायक निर्णय घेत चव्हाण यांच्या नावाला पसंती दिली.
