जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या जिल्हा नियोजन फंडातून दि २७ रोजी खडीकरण कामाचे भूमिपूजन!
(पाटकुल येथे दिनांक 27 ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक ९ वाजता सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची केले चरणराज चवरे यांनी आवाहन)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पेनुर जिल्हा परिषद गटातील विविध विकास कामांचे व जालिंदर बापू गावडे वस्ती रस्ता येथील खडीकरण कामाचे भूमिपूजन दिनांक 27 ऑक्टोबर रोजी ठीक सकाळी नऊ वाजता पाटकुल येथे आयोजित केले असल्याची माहिती सोलापूर जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख चरण राज चवरे यांनी दिली आहे.. सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी आणून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी मोठे प्रयत्न केले होते.. या रस्त्याची अवस्था खूप बिकट झाली होती पण शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चौरे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून हा निधी आणून येथील खडीकरणाच्या कामाला सुरुवात करणार असल्याचे सांगितले आहे.. दिनांक २७ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक ९ वाजता सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी सर्व या भागातील नागरिकांना केले आहे..

