
दत्तकला शिक्षण प्रसारक मंडळामध्ये आगामी शैक्षणिक वर्षासाठी नवीन दहा बस दाखल!
(प्रा. रामदास झोळ व सौ माया झोळ मॅडम यांच्या शुभहस्ते नवीन बसेसचे केले उद्घाटन)
दत्तकला शालेय शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या सेवेस 10 बसेस रूजू झाले आहेत. शालेय शिक्षण घेत असताना घर ते शाळा हा प्रवास आपल्या विद्यार्थ्यांना आरामदायी व्हावा, सुखकर व्हावा हाच उद्देश समोर ठेवून दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सर यांनी हा निर्णय घेत दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांची अत्याधुनिक सुविधा व्हावी तसेच आरामदायी बैठक व्यवस्था असणाऱ्या एकूण 10 बसेस खरेदी केल्या आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांची उत्तम सोय होणार आहे.
याप्रसंगी बसेसचे पूजन प्रा. रामदास झोळ सर व सौ. मायाताई झोळ मॅडम यांच्या शुभहस्ते पार पडले.
यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेचे विविध विभागांचे प्राचार्य व शिक्षक शिक्षकेत्तर, कर्मचारी उपस्थित होते.