
भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्री केल्यास अन्न व औषध प्रशासन करणार कठोर कारवाई:सह.आयुक्त सुनिल जिंतुरकर
यात्रा कालावधीत पंढरपुरात भेसळयुक्त पेढे तसेच भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ त्याचबरोबर निकृष्ट अन्नपदार्थांची विक्री होऊ नये यासाठी अन्न विभागावर देखील मोठी जबाबदारी असल्याने आज पंढरपूर येथे अन्न व औषध प्रशासन विभागाने हाॅटेल व्यवसायिक आदी व्यापारी यांच्या समवेत बैठक घेऊन सुचना व मार्गदर्शन केले.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे केल्या महिनाभरापासून पंढरपुरात प्रशासकीय पातळीवर करण्यात येणाऱ्वया तयारीचा आढावा घेताना दिसून येत आहेत पंढरीत येणाऱ्या भाविकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी प्रशासन आत्तापासूनच दक्षता घेताना दिसून येत आहे.
यात्रा कालावधीत पंढरपुरात भेसळयुक्त पेढे तसेच भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ त्याचबरोबर निकृष्ट अन्नपदार्थांची विक्री होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागावर देखील मोठी जबाबदारी आहे आणि हीच बाब जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या निदर्शनास नुकतीच पत्रकारांनी देखील आणून दिली होती. उपवासाच्या भगरीतून विषबाधा, बासुंदीतून विषबाधा,तसे केमिकल युक्त दुध यामुळे पंढरपुरात अनेक वेळा भाविकांना मोठा त्रास झाल्याचे दिसून आले आहे त्यामुळे अन्न विभागाकडून कठोर उपाय
योजना देखील महत्त्वाची मानले जाते आणि यातूनच सोलापूरचे सहाय्यक अन्न व औषध प्रशासन आयुक्त सुनील जिंतूरकर , निरीक्षक भुशी, स्वामी यांच्यासह अन्न विभागाच्या विविध अधिकाऱ्यांनी आज पंढरपुरात शहरातील हॉटेलस, व्यावसायिक, प्रासादिक विक्री दुकान,पेढे व्यवसाय, बेकरी पदार्थ विक्रेते, दुग्धजन्य पदार्थ विक्रेते आदींनी व्यवसायिक, व्यापारी, व्यापारी संघटना यांच्या समवेत समवेत बैठक घेत खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.त्याचबरोबर या अन्नपदार्थ विक्रेत्यांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी पंढरपुरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनीही आपल्या सूचना व अडीअडचणी मांडल्या तर याबाबत अधिक माहिती देताना सहाय्यक अन्न व औषध प्रशासन आयुक्त सुनील जिंतूरकर म्हणाले की यात्रा कालावधीत जवळपास २५ अन्न औषध प्रशासनाचे निरीक्षक विविध ठिकाणी तपासणीसाठी कार्यरत राहणार असून तसेच सॅम्पल घेण्यासाठी व तपासणीसाठी फिरते परीक्षण वाहन उपलब्ध केले जाणार आहे असे त्यांनी सांगितले.तर खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या व्यापारी, व्यवसायिक,परप्रांतीय फेरीवाल्यांना यांच्यावर करडी नजर ठेवली जाणार आहे.पंढरपुर व परिसरातील नागरिक, व्यापारी,व्यवसायिक, फेरीवाल, दुकानदार यांना अन्नपदार्थ विक्री करताना गुणवत्ता व स्वच्छता यांची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.