काँग्रेसचे समन्वयक प्रकाश घाळे यांचा महाराष्ट्रभर दौरा
सर्व सामान्य शेतकरीवर्गाच्या आडचणी जाणून घेवून सोडविणार :प्रकाश घाळे
लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. तसेच सर्व सामान्य शेतकरीवर्गाच्या आडचणी जाणून घेवून सोडविणार असून कार्यकर्त्यांचे तळागाळातील कार्यकर्त्यांची मनोबल वाढवण्यासाठी व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मोर्चे बांधणीसाठी काँग्रेसचे प्रकाश घाळे यांचा हा दौरा मानला जातो.
काँग्रेस पक्षाचे प्रकाशजी घाळे हे समन्वयक असून बरोबरच ते महाराष्ट्र राज्याचे किसान काँग्रेसचे सुद्धा प्रभारी सुद्धा आहेत लोकसभा निवडणुकीत प्रकाश घाळे यांच्यावर महाराष्ट्रातील नांदेड, लातूर या दोन विशेष लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी होती तर कर्नाटकातील कलबुर्गी आणि बिदर या दोन लोकसभा मतदारसंघात घाळे यांनी या दोन राज्यातील चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निवडणून आणण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे.
नांदेड व लातूर मतदारसंघातील सर्व समाज घटकातील लोकांना तसेच सर्व सामान्य शेतकऱ्यांना सोबत घेऊन प्रकाश घाळे यांनी उत्तमरित्या कामगीरी बजावली होती.
त्या अनुषंगानेच काँग्रेस पक्षाकडून प्रकाश घाळे यांना महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पाठवले आहे यंदाची सर्वसामान्य शेतकऱ्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती व सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विश्वास अधिक बळकट व्हावा व त्यांना सर्व घटकातून न्याय मिळावा व आगामी काळातही शेतकऱ्यांचा हा विश्वास कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार असल्याची माहिती मिळत आहे.
याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मा.प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या पत्राद्वारे श्री प्रकाशजी घाळे हे दौऱ्याच्या येणार असल्याचे सांगत सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना आपल्याकडून संपूर्ण सहकार्य करावे तसे आपल्या तालुक्यातील सर्व ब्लाॅक अध्यक्षांना सहकार्य करण्याबाबत लेखी पत्राद्वारे सूचना दिल्याचे दिसत आहेत.