
चिंचोली एमआयडीसी मध्ये केमिकल चे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेल्यामुळे जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील झाले संतप्त!
(राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल)
चिंचोली एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्या सुरू आहेत. त्याच्यामध्ये विविध वस्तू तयार करण्याच्या सुद्धा कंपन्या आहेत. परंतु जे तयार केलेले जे सांड केमिकल युक्त पाणी जे आहे त्यांना सोडण्यास कुठेही जागा मिळत नसल्याने ते रातोरात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ही केमिकल युक्त पाणी सोडतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे अतोनात नुकसान होत असलेली दिसत आहे.
याबाबत सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी या शेतकऱ्यांसह अधिकाऱ्यांची भेट घेत या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या या एमआयडीसी मधील अनेक कंपन्यांनी आजूबाजूच्या शेतामध्ये ही केमिकल युक्तपाणी सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तेथील पिकांना मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे त्वरित या कंपन्यांनवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.