मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची महापूजा करणार!
(आज दुपारी ठीक चार वाजता कृषी पंढरी महोत्सवाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते शुभारंभ)
एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक मंगळवारी, १६ जुलै रोजी पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत.
आज मंगळवार, १६ जुलै रोजी सायंकाळी चार वाजता कृषी पंढरी प्रदर्शनाचे कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात उद्घाटन करणार आहेत.
सायंकाळी सव्वाचार वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह पंढरपूरकडे प्रयाण करणार असून, साडेचार वाजता ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ या पर्यावरण विषयक जनजागृतीपर उपक्रमाचा समारोप सोहळा होणार आहे.
उद्या बुधवार, दिनांक १७ जुलै रोजी मध्यरात्री २:२० वा. शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने श्री विठ्ठल रखुमाई मंदिराकडे प्रयाण व श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा.
पहाटे साडेचार वाजता देववृक्ष सुवर्णपिंपळ बीज प्रसादाचे प्रातिनिधीक स्वरूपात वारकऱ्यांना वाटप. अजान रुक्ष लोकार्पण व माहितीपत्रकाचे विमोचन कार्यक्रम.
पहाटे पावणेपाच वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. पहाटे पाच वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी नऊ वाजता सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी भेटीगाठीसाठी राखीव. सकाळी साडेनऊ वाजता मोटारीने चंद्रभागा बसस्थानकाकडे प्रयाण.
सकाळी दहा वाजता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चंद्रभागा बसस्थानक व यात्री निवास इमारत लोकार्पण या कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी साडेदहा वाजता तुळशी वृंदावन लोकार्पण सोहळ्याला उपस्थिती.
सकाळी पावणेअकरा वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवन भूमिपूजन कार्यक्रम उपस्थिती. सकाळी अकरा वाजता लिंक रोडवर महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान राज्यस्तर अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे भूमिपूजन.
सकाळी सव्वाअकरा वाजता पंचायत समिती येथे ‘स्वच्छ वारी निर्मल वारी’ कार्यक्रमाचा समारोप. त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता शासकीय वाहनाने बारामतीकडे प्रयाण.