मुख्यकार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीस दिली सदिच्छा भेट!
(महेश नाना साठे यांच्या विशेष प्रयत्नामुळे ग्रामपंचायतीस आषाढी वारीचा निधी)
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख महेश साठे यांच्या विशेष प्रयत्नाने, आषाढी वारीनिमित्त लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीसाठी विशेष निधी प्राप्त करण्यात आला आहे. सदरच्या निधीचे योग्य नियोजन करण्यासाठी
सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवळे यांनी लक्ष्मी टाकळी परिसरातील पाहणी केली.
या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतमध्ये विविध विकास कामाच्या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी ग्रामपंचायतला प्रथमच भेट दिली.
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीला आषाढी वारीसाठी निधी नियोजनामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. सदरचा निधी ग्रामपंचायतकडे वर्ग करण्यात आला आहे.
प्रथमच देश स्वतंत्र झाल्यापासून लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत ही आषाढीवारी निधी नियोजनामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या दिलेल्या निधीचे नियोजन करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद मुख्याधिकारी मनीषा आवळे, अतिरिक्त मुख्य अधिकारी शेळकंदे, अमोल जाधव, गटविकास अधिकारी सुशील संसारे, ग्रामपंचायत सरपंच संजय साठे, उपसरपंच महादेव पवार, ग्रामसेवक जयंत खंडागळे,ग्रामपंचायत सदस्य,सर्व कर्मचारी उपस्थित होते.
आषाढी वारीमध्ये होणाऱ्या पुढील कामाची रूपरेषा ठरविण्यासाठी सर्व अधिकारी उपस्थित होते.यावेळी टाकळी ग्रामपंचायत मध्ये विशेष प्रयत्न करून केलेल्या तलावाची व बंधारा पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवळे यांनी करून सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक कर्मचारी यांचे कौतुक करून अभिनंदन केले.
सदरच्या या कामासाठी कसलाही निधीची कमी पडू देणार नाही.असे वचनही देण्यात आले. हा केलेला उपक्रम स्तुत्य आहे.असे गौरविण्यात आले. यावेळी साठे बंधू यांचे विठाई सदन या निवासस्थानी त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला आहे.