
कै.सुरेशभाऊ लिंबाजीराव पाटील यांचे ०६ पुण्यस्मरण संपन्न!
(सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती; कीर्तनाच्या भक्तिमय कार्यक्रमात स्मृतींना उजाळा)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेशचे मा. मुख्य प्रवक्ते मा.उमेश पाटील यांचे वडील कै. सुरेश पाटील यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रम आज, दिनांक ०३ ऑगस्ट २०२५ रोजी मोहोळ येथील सावली बंगला येथे अत्यंत भाविक आणि श्रद्धायुक्त वातावरणात संपन्न झाला.
या प्रसंगी कै. सुरेशभाऊ लिंबाजीराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी आदरांजली वाहिली. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन कार्यक्रमाने वातावरण अधिकच भक्तिमय झाले होते. कीर्तनकारांनी आपल्या सुस्वर वाणीद्वारे जीवनमूल्ये, सद्विचार व संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांच्या मनामध्ये आध्यात्मिक ऊर्जा निर्माण केली.
कार्यक्रमाला सोलापूर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह मोहोळ तालुक्यातील विविध पक्षांचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, नागरिक व पाटील कुटुंबाचे नातेवाईक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा. उमेश पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,
“माझे वडील कै. सुरेशभाऊ लिंबाजीराव पाटील यांनी त्यांच्या साध्या जीवनशैलीतून समाजासाठी एक आदर्श ठेवला. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित या सोहळ्याला उपस्थित राहून श्रद्धांजली वाहणाऱ्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”
कार्यक्रमावेळी आई श्रीमती लोपमुद्रा सुरेश पाटील, मोठे भाऊ भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस माजी जिल्हाध्यक्ष संतोषअण्णा पाटील, दुसरे भाऊ डॉक्टर रमेश पाटील यांच्यासह संपूर्ण पाटील कुटुंबीय उपस्थित होते. या भाविक सोहळ्याने कै. सुरेश पाटील यांच्या स्मृतींना केवळ उजाळा नाही, तर समाजासाठी एक प्रेरणास्थान म्हणून अधोरेखित केले.