नगरपालिका निवडणुकांसाठी भाजपा पक्षाने उघडले पंढरपुरात मध्यवर्ती कार्यालय!
(नगरपालिका निवडणुकीसाठी सर्व इच्छुकांनी मागणी अर्ज सादर करण्याचे शहराध्यक्ष रोहित पानकर यांनी केले आवाहन)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पंढरपूर नगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी मागणी करण्यासाठी टिळक स्मारक येथे मध्यवर्ती निवडणूक कार्यालय उघडण्यात आले आहे.
याठिकाणी भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहरच्या वतीने इच्छुक उमेदवारांना उमेदवारी मागणी अर्ज उपलब्ध केले असल्याची माहिती भाजपचे शहर अध्यक्ष रोहित (लाला) पानकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
राज्यात गेल्या ०४ वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर ०४ नोव्हेंबर रोजी जाहिर झाला आहे. त्यानुसार राज्यात ०२ डिसेंबरला मतदान होणार असून ०३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
१० नोव्हेंबर पासून उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करावी लागणार आहे. त्यामुळे पुढील 8 दिवसांत उमेदवारांची नावे निश्चित करावी लागणार आहेत.
त्याअनुषंगाने भारतीय जनता पार्टी, पंढरपूर यांच्या वतीने पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 साठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती कार्यालय, टिळक स्मारक मैदान, पंढरपूर येथे उपलब्ध होणार आहेत. यासाठी दि. 9 नोव्हेंबर व 10 नोव्हेंबर 2025 रोजी
सकाळी १०ते दुपारी ०१ व सायंकाळी ०३ ते ०७ पर्यंत
अर्ज स्वीकारण्याची अंतिम वेळ वेळ राहणार आहे.
तरी इच्छुक उमेदवारांनी वरील वेळेत भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती कार्यालय, टिळक स्मारक मैदान, पंढरपूर येथून अर्जाचा फॉर्म घेऊन तो पूर्ण भरून सादर करावा. असे आवाहनही भाजपचे शहराध्यक्ष रोहित पानकर यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेचेवेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष मस्के, अक्षय वाडकर यांचे सह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
