करमाळा तालुक्यातील कोणत्याही जिल्हा परिषद गटातून महायुतीमधुन भाजपने संधी दिल्यास निवडणूक लढवणार – प्रा. रामदास झोळ सर
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील कोणत्याही जिल्हा परिषद गटातून भाजपने संधी दिल्यास निवडणूक लढवणार असे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले.
दत्तकला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे जनतेमध्ये आपल्याबद्दल प्रेम व आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते व नागरिकांकडून निवडणूक लढवण्याचा आग्रह होत असल्याचे भाजप नेते व शिक्षणतज्ज्ञ प्रा. रामदास झोळ सर यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टीने करमाळा तालुक्यातील कोणत्याही जिल्हा परिषद गटातून संधी दिल्यास आपण निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चिखलठाण येथे प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने नवीन वर्षानिमित्त दिनदर्शिकेचे प्रकाशन व वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. महायुतीमध्ये शिवसेना सध्या भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही भाऊ एकत्र आहे. त्यामुळे महायुतीमध्ये कुणाला कुठल्या जागा दिल्या जातात यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असुन ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांनी महायुती म्हणून म्हणून एकत्र काम करावे लागणार आहे त्यामुळे पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी एक निष्ठावान भाजप कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे.
या कार्यक्रमास दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन व चिखलठाणचे माजी सरपंच चंद्रकांत काका सरडे, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नवनाथ बापू झोळ, माजी संचालक शहाजीराव देशमुख सर, सरडे भाऊसाहेब, मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक हरिभाऊ मंगवडे, हरिभाऊ झिंजाडे, शेलगावचे माजी सरपंच रायचंद दादा खाडे, कुगावचे दत्तात्रय कामटे, वाशिंबे गावचे माजी सरपंच अनुरथ दादा झोळ, पांडुरंग झोळ, चंद्रशेखर जगताप, श्रीकांत साखरे, तुकाराम खाटमोडे, चांगदेव गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे लोकार्पण करून उपस्थित नागरिकांना दिनदर्शिकांचे प्रकाशन व वितरण करण्यात आले. कार्यक्रमास पत्रकार बांधवांसह चिखलठाण व परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
