
भाजपा दक्षिण मंडल व व श्री रमेश माने मित्र परिवाराच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना दि ०६ जुलै फराळाचे वाटप!
(वारकऱ्यांच्या सेवेसाठी सलग १० वर्ष नित्यनेमाने वारकऱ्यांची सेवा बजावत आहेत तालुकाध्यक्ष रमेश माने)
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त हजारो वैष्णवांचा मेळा श्री क्षेत्र पंढरी नगरीमध्ये एकवटला असून लाखो वारकऱ्यांची मांदियाळी श्री क्षेत्र पंढरी नगरीमध्ये येत असून दिनांक ०६ जुलै २०२५ रोजी होणाऱ्या देवशयनी आषाढी एकादशी निमित्ताने भारतीय जनता पार्टी मोहोळ दक्षिण मंडल व श्री रमेश माने मित्र परिवाराच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी पंढरी नगरी जाणाऱ्या वारकऱ्यांना एक प्रेमाची भेट म्हणून साबुदाणा,फराळ, केळी चहा व प्रसादाचे वाटप, करण्यात येणार असून या पवित्र अशा आषाढी एकादशी निमित्याने सर्व वारकरी भावी भक्तांना फराळ वाटपाचा स्तुत्य उपक्रम रमेश माने मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम पंढरपूर मोहोळ रोडवरील नक्षत्र लॉन्स येथे पार पडणार असून यासाठी भाजपा मोहोळ तालुका दक्षिण मंडळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे…