भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची सोलापूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात नियुक्ती!
(२४ ऑगस्ट पासून ते ३० ऑगस्ट पर्यंत सोलापूर जिल्ह्यात प्रवास योजना राबविण्यात येणार:- खासदार धनंजय महाडिक)
(भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा. नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडून खासदार धनंजय महाडिक यांना मोठी जबाबदारी)
महाराष्ट्र राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील जवळजवळ सहा विधानसभा मतदारसंघात भाजप आणि राज्यसभेचे खासदार धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडिक, यांची नियुक्ती केली असून या सोलापूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघात “प्रवास योजना” आयोजित केली आहे.
यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांना भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी जबाबदारी सोपवली असून माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राम सातपुते यांना तसे पत्र प्राप्त झाल्याचा दुजोरा आ.रामसातपुते यांच्या संपर्क कार्यालयाकडून मिळाला आहे.
यामध्ये जरी मतदार संघाचा खुलासा केलेला नसला तरी, तरीपण ही मोठी जबाबदारी असल्यामुळे 24 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंत ही प्रवास योजना असल्यामुळे त्या त्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारून काम करावे अशी माहिती मिळत आहे.
यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या १५० ते १८० पदाधिकारी यांच्यासोबत भोजन बैठकीचे आयोजन करणे!
आपल्या विधानसभा मतदारसंघात बुथस्तरीय कार्य योजना या कार्य अहवाल सादर करणे याचबरोबर, विधानसभा मतदारसंघातील राजकीय व सामाजिक विश्लेषक यांच्याबरोबर चर्चा करणे!
आप-आपल्या विधानसभा मतदारसंघात ५०० छोट्या छोट्या सामाजिक बैठकांच्या आयोजन करणे व त्याची माहिती सादर करणे!
याचबरोबर अनेक योजनांचा स्थानिक लोकांना कसा फायदा होईल व त्याचा लाभार्थींपर्यंत पोहोचवण्यापर्यंत घेतो समन्वय साधने व कार्य अहवाल सादर करणे या व इतर सर्व बाबींसाठी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची नियुक्ती केली असून लवकरच या दौऱ्याचा तपशील तारखेसहित जाहीर होणार असून त्या त्या विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी त्यासाठी तयारी करावी असे भारतीय जनता पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.