
बालगणेश तरूण मंडळाने पैलवान ग्रुप 3003 ची पुळुज येथील दहिहंडी!
(भाजपा तालुकाध्यक्ष रमेशजी माने व लिंगेश्वर देवस्थान कमिटी यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न)
पंढरपूर तालुक्यातील अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पूर्व भागातील सर्वात मोठ्या उत्साहात “दहीहंडी उत्सव 2025” आज सालाबाद प्रमाणे संपन्न झाला.
पंढरपूर तालुक्यातील पुळुज येथील पैलवान ग्रुप ३००३ च्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी अत्यंत आनंदी उत्साही व धार्मिक वातावरणामध्ये पुळूज येथे संपन्न झाली हा दहीहंडीचा कार्यक्रम मोहोळ तालुका दक्षिण मंडलाचे तालुकाध्यक्ष रमेशजी माने, व लिंगेश्वर देवस्थान कमिटी यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न झाला तसेच या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन येथील पैलवान ग्रुप ३००३- व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपसरचिटणीस लिंगेश्वर शेंडगे यांच्यावतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाठी त्यांनी संपूर्ण परिश्रम घेतले आहे.
यावेळी मोहन काका गावडे,रतिलाल अप्पा गावडे, किसन बाबा जाधव, सिताराम दादा भोसले, मधुकर बाबर, बापु कोंडकर, पैलवान महादेव शेंडगे, नामदेव देवकते, माणिक शिंदे, विठ्ठल देवकते, अमोल जाधव, अमोल अंकुशराव, गोपाळ भोसले, युवराज धनवे, अजय व्होनकोळस, अभिजीत कोरे, उमेश लोमटे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते
