
बहुजन सत्यशोधक संघाच्या*
पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी मा. सचिन जावळे
(अनुसूचित जाती व जमाती च्या लोकांवर होणाऱ्या अन्यायासाठी बहुजन सत्यशोधक परिषदेच्या वतीने वाच्या फोडण्याचे मोठे काम करणार:- मा सचिन जावळे)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
बहुजन सत्यशोधक संघ हे एससी एसटी आणि धर्म परिवर्तित मूलनिवासी लोकांसाठीसाठी संघर्ष करणारे सामाजिक संघटना असून या संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सचिन जावळे यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहोळ यांनी केली,ओहोळ हे बोलताना म्हणाले की या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर एस, सी, एस,टी.वर अन्याय होत आहे तरीही प्रशासन याची दखल घेत नाही ज्या लोकांवरती अन्य अत्याचार होतो त्याच लोकांनावरती ३९५ सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातात, म्हणून युवकांनी एकत्र येऊन या देशांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधानाची शंभर टक्के अंमलबजावणी करणे हे उद्दिष्ट घेऊन संघटन काम करत आहे एससी एसटी चा निधी इतर ठिकाणी जाणीवपूर्वक वळवला जात आहे,इलेक्ट्रिकल वोटिंग मशीन तात्काळ बंद करण्यात यावी त्यासाठी शासनाच्या विरोधात मोठा लढा उभा करणे गरजेचे आहे,कामगार,शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार महिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये संघटनेमध्ये जोडल्या जात आहेत फुले शाहू आंबेडकरांचे विचार घराघरांमध्ये पोहोचवणे हे काम युवकांनी करणे गरजेचे आहे संघटन त्यांच्या पाठीशी आहे असे सुनील ओहोळ म्हणाले म्हणाले,
नूतन पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन जावळे
म्हणाले ओबीसीची शासनाने जातीनिहाय जनगणना शासनाने तात्काळ करावी मराठा ओबीसी आरक्षणाचा विषय तात्काळ मार्गे लावावा, भूमिहीन लोकांना तात्काळ शेतीचे वाटप करावे, महापुरुषांचे विचार युवकांमध्ये पोहोचवून जागृती निर्माण करण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून करून युवकांना जोडण्याचं काम मी करणार, येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या लोकांवर अन्याय अत्याचार होतो त्यांना न्याय देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून नेहमी मी प्रयत्न करेन असे जावळे म्हणाले, यावेळी सूत्रसंचालन पश्चिम महाराष्ट्र सदस्य अनिल सरवदे यांनी केले यावेळी बहुजन सत्यशोधन संघाचे युवक प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ लांडगे मल्हारी फाळके प्रदीप सरवदे
विकास जावळे असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
