
अनिलदादा सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त कुस्ती स्पर्धा संपन्न
(भव्य दिव्य कुस्ती स्पर्धेत महिला गटात रोहीणी माळी यांनी मारली बाजी)
भैरवनाथ उद्योग समूहाचे उपाध्यक्ष अनिल सावंतयांच्यावाढदिवसानिमित्त अनिल सावंत मित्र मंडळ पंढरपूर-मंगळवेढा यांच्या वतीने एका रोमांचक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये महाराष्ट्रातील अव्वल कुस्तीगीर सहभागी झाले होते. या कार्यक्रमात चाहते आणि नवोदित कुस्तीगीरांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला.
या स्पर्धेमध्ये एक लाख रुपये, पन्नास हजार, पस्तीस हजार, पंचवीस हजार, पंधरा हजार व दहा हजार रुपये अशी बक्षिसे तर महिलांसाठी ५० हजार, ४० हजार, ३० हजार, वीस हजार, १० हजार, ५ हजार रुपयांची बक्षीसे ठेवण्यात आली होती.
वाढदिवसानिमित्त सोमवार दि.१९ मे रोजी दुपारी ४ वाजता सलगर बु. येथे भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान संपन्न झाल्या. या कुस्त्यांच्या मैदानात पै. धनाजी कोळी पुणे व पै.राघू ठोंबरे कोल्हापूर यांची एक लाखांची कुस्ती बरोबरीत सुटली तर महिला गटात पै. सई फडतरे मंगळवेढा व पै. रोहिणी माळी परांडा यांच्या मध्ये रोहिणी माळी हिने बाजी मारली, परंतु सईने तिला चांगली लढत दिली.
पुरुष गटात पै. शुभम माने पुणे व पै. किरण मिसाळ अकलूज यांची ७५ हजारांची कुस्ती झाली, पै. परमेश्वर गाडे बामणी व पै. बाळकृष्ण शेळके, कोल्हापूर यांची ५० हजारांची, पै. सौरभ घोडके मंगळवेढा व पै. श्रीकांत खरात वाखरी यांची ३५ हजारांची, पै. समर्थ चौरे पेनूर व पै. कृष्णदेव बनसोडे जामगाव यांची २५ हजारांची, पै. चैतन्य बोराडे तळसंगी व पै. समाधान ओमने मंगळवेढा यांची १५ हजारांची तर पै. सुर्या अभंगराव, वाखरी व पै. ओंकार हजारे, खर्डी यांची १० हजारांची कुस्ती होणार आहे. तसेच महिला गटात पै.श्रुती गेजगे मंगळवेढा व पै. श्रावणी हजारे मंगळवेढा यांची ४० हजारांची, पै. श्रेया गेजगे मंगळवेढा व पै. सोनम जाधव पंढरपूर यांची ३० हजारांची, पै. अनन्या हिंगमिरे मंगळवेढा व पै. मंजिरी जाधव पंढरपूर यांची २० हजारांची, पै. आदिती हिंगमिरे मंगळवेढा व पै. गौरी भोसले सरकोली यांची १० हजारांची तर पै. पायल गवळी मंगळवेढा व पै.श्रुती पाटील एकलासपूर यांची ५ हजारांची कुस्ती होणार आहे. या कुस्त्यांचे संयोजक अनिलदादा मित्र परिवारातील इंद्रजित पवार, चंद्रकांत देवकर, अशोक निकम, तानाजी चव्हाण यांनी केले.
या कुस्ती स्पर्धेला….. यांनी उपस्थित राहून कुस्तीगीरांचे मनोबल उंचावले.
या स्पर्धेने कुस्तीगीरांना त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेच नाही तर शारीरिक तंदुरुस्ती आणि सामुदायिक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी खेळांचे महत्त्व देखील अधोरेखित केले.
स्पर्धेचे निवेदन अशोक धोत्रे यांनी केले तर आभार अजय आदाटे यांनी मानले.
चंद्रकांत देवकर गुरुजी लवंगी: सलगरचे सरपंच श्री सुदाम कदम, दामाजी शुगर चे संचालक श्री बसवराज पाटील शिरनांदगी सरपंच श्री गुलाब थोरबोले श्री आप्पा माने सरकार श्री शशिकांत निकम डॉ कृष्णात माने श्री माजी सरपंच महादेव देवकर श्री भारत निकम श्री लाला शेख श्री सुजित जाधव श्री अरुण गायकवाड श्री मेजर निंबाळकर श्री आबा पवार श्री महेश पाटील पत्रकार श्री महेश टिक्के श्री बंडू पुजारी निगडी सरपंच श्री शिंवाजी चव्हाण श्री धऱ्याप्पा हडलसंग श्री समीर जाधव श्री पिनू जाधव श्री मदन घाटगे श्री कृष्णा निकम श्री नागा भुसे श्री नामदेव पवार श्री पंढरी इंगोले श्री मानसिंग पवार सर
आयोजक,
श्री चंद्रकांत देवकर श्री इंद्रजीत पवार श्री तानाजी चव्हाण
श्री अनिल दादा सावंत मित्र परिवार मंगळवेढा