*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण समारंभ!!*
*(आ.समाधान आवताडे यांनी केले सर्व पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन)*
*(२६ ऑक्टोबर २०२५ रोजी भव्य अशा कार्यक्रमाने होणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण!)*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
मंगळवेढा शहरात लोकसहभागातून उभा करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण सोहळा दि.26 ऑक्टोबरला होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.
शहरांमध्ये अनेक संतांचे वास्तव लाभल्याने संताची भूमी म्हणून मंगळवेढा शहराची ओळख राज्यभर निर्माण झाली.अशा परिस्थितीत शहरात 360 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज विजापूर स्वारीवर जात असताना शहरातील भुईकोट किल्ल्यामध्ये त्यांनी मुक्काम केला.
मात्र येथील मराठा बांधवांनी पुतळा उभारणीमध्ये सर्व समाज बांधवांचा सहभाग असावा या भावनेतून लोकसहभागातून उभा करण्याचा शेवटी निर्णय घेतला त्यानुसार तब्बल ३१ लाख रुपये लोकसभागातून जमा करण्यात आले.
त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या 18 फुट उंचीची 4.5 टन वजनाची अश्वारूढ पुतळ्याची उभारणी मूर्तीकार महेंद्र धोपटे यांच्या संकल्पनेतून करण्यात आली गतवर्षी हा पुतळा पुण्यावरून आणून मंगळवेढा शहरात ठेवण्यात आला.
शेवटी सुशोभीकरणासाठी शासनाने 75 लाखाचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर याचे काम सुरू झाले.
नगरपालिका निवडणुकीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे लोकार्पण करण्याचा घाट येथील सकल मराठा समाज बांधवांनी घेतला त्या संदर्भात आ.समाधान आवताडे यांच्या अध्यक्षेतेखाली बैठक घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्याबरोबर मराठा आंदोलन मनोज जरांगे-पाटील, सार्वजनिक बांधकाम बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खा. संभाजी राजे यांना या पुतळा लोकार्पण समारंभासाठी आमंत्रित करण्यावर एकमत झाले.

