
कृषिमंत्री दत्तात्रेय मामा भरणे यांची प्रा. रामदास झोळ सर यांनी घेतली भेट!
(कृषिमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच भाजपा नेते प्रा. रामदास झोळ यांनी केला भरणे मामांचा सन्मान)
दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपा नेते प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी काल दिनांक १७ऑगस्ट २०२५ रोजी पुणे जिल्ह्यातील भिगवन येथे एका कार्यक्रमानिमित्ताने महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त कृषी मंत्री दत्तात्रेय मामा भरणे यांची भेट घेतली.. यावेळी दत्तात्रेय मामा भरणे व प्राध्यापक रामदास झोळसर, यांच्यामध्ये विविध विषयांवरती सखोल चर्चा झाली. सोलापूर जिल्ह्यातील विशेषता करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न वाढलेल्या बी बियाणे व खतांच्या किमती यावर प्रा.रामदास झोळ सर यांनी येणाऱ्या आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये आपण चर्चा करावी व सर्व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत याबाबत चर्चा झाली आहे. असे वृत्त आहे. यावेळी त्यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांचा दत्तकला शिक्षण संस्थेच्या वतीने प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी यथोचित सन्मान केला.
