पुन्हा राजकीय भूकंप; प्रणव परिचारक धरणार वेगळी वाट?
(प्रशांत परिचारक व समाधान आवताडे एकत्र येत असताना प्रणव परिचारक वेगळी वाट धरणार)
भारतीय जनता पक्षाकडून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी काल सोलापूर जिल्हा दौरा केला यावेळी त्यांनी विशेषतः 253 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला यावेळी नाराज असलेल्या माजी आमदार प्रशांत मालक परिचारक, यांची बंडखोरी थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण आज दिवसभर पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात याचे तीव्र प्रसाद उमटलेले दिसून आले पांडुरंग परिवाराच्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी प्रशांत परिचारक तुम्हाला जर अडचण असेल तर तुम्ही युवक नेते प्रणव परिचारक यांना, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे रिंगणात उतरवा अशी आग्रही मागणी केली आज दिवसभर पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराजवळच्या वाड्यावर पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील सर्व समर्थक व कार्यकर्त्यांची दिवसभर गर्दी होती काही कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रणव परिचारक यांनी अर्ज भरावा आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी सक्षम आहोत अशी समर्थक भूमिका घेताना दिसत आहेत.
पांडुरंग परिवाराचे ज्येष्ठ नेते पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी पाठिंब्याचा निर्णय जरी घेतला असला मात्र नक्कीच या मतदारसंघातून प्रणव परिचारक यांनी उभे राहावे अशी सर्व युवक कार्यकर्त्यांची व सर्व पंढरपूर शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांची तीव्र मागणी आहे.
अर्ज भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना प्रणव परिचारक यांनी जर वेगळी भूमिका घेतली तर आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही..
प्रणव परिचारक यांना तालुक्यातील सर्व तरुण समर्थक व कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा यावेळी दिसून येत आहे तरी पंढरपूर तालुक्यात वेगळी राजकीय वाटचाल होऊ शकते असे काही राजकीय विश्लेषणाचे मत असून पांडुरंग परिवाराचा एक युवा नेता जर आमदार झाला तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनता त्यांना स्वीकारेल असे ही पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील राजकीय जाणकार बोलू लागले आहेत.