आ.समाधान आवताडे यांचे लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन
(पंढरपूर तालुक्यातील २२ गावातील महिलांसाठी कासेगाव आणि लक्ष्मी टाकळी गावात रक्षाबंधन सोहळा)
श्रावण महिना आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना भेटण्याचे, त्यांच्याशी हितगुज करण्याचे नियोजन आ. समाधान आवताडे यांनी केले आहे. पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी हळदी कुंकू, रक्षाबंधन, स्नेह भोजन असे नियोजन केले आहे. आज ( रविवार दि १ सप्टें ) लक्ष्मी टाकळी आणि कासेगाव येथे रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलें आहे.
सध्या श्रावण महिना सुरू आहे, नुकताच रक्षाबंधन सण संपन्न झालेला आहे. या पार्श्वभूमीवर आ. समाधान आवताडे यांच्यावतीने पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील माता, भगिनींसाठी रक्षाबंधन, हळदी कुंकू समारंभ आणि यानिमित्ताने स्नेह भोजन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आ.समाधान आवताडे स्वतः उपस्थित राहून महिलांशी संवाद साधून त्यांच्या शासकीय पातळीवरील योजना, त्यांचा लाभ घेण्यासाठी अडचणी सोडवण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.
*१) दि. १ सप्टेंबर रोजी*
*रांजणी, मुंढेवाडी, अनवली, गोपाळपूर, एकलासपुर, सिद्धेवाडी, तावशी, तनाळी, खर्डी, तपकिरी शेटफळ, कासेगाव, चीचुंबे, शिरगाव, तरटगाव या गावातील महिलांसाठी*
*स्थळ : कासेगाव येथील यल्लंमा मंदिर परिसर*
*२) वाखरी, गादेगाव, कौठाळी, शिरढोण, कोर्टी, बोहाळी, उंबरगाव, लक्ष्मी टाकळी या गावातील महिलांसाठी*
*स्थळ – लक्ष्मी टाकळी बायपास येथील प्रथमेश मंगल कार्यालय*
*२) दिनांक ३ सप्टेंबर रोजी*
*पंढरपूर शहर, उपनगर आणि इसबावी भागातील महीलासाठी*
*श्रीराम मंगल कार्यालय*, *इसबावी*,
*संत मीराबाई मठ, कैकाडी महाराज मठाजवळ*, *पंढरपूर*
*शनेश्वर मंगल कार्यालय, सांगोला रोड, पंढरपूर*
*येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे*.
चौकोट
बहीण भावाच्या नात्याला दृढ करणारा हा रक्षाबंधन सोहळा असून यानिमित्ताने माता भगिनिंशी हितगुज करण्याचा प्रयत्न आहे. माता भगिनीचा आशीर्वाद मिळाल्यामुळे आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे माता भगिनिशी संवाद साधण्याचा हेतू आहे, माता भगिनींना आवाहन आहे की त्यांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित राहून आशीर्वाद द्यावेत.
आ. समाधान आवताडे