*प्रभाग क्रमांक ३ अचे व प्रभाग क्रमांक पाच ब भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मोहोळ येथे भव्य जाहीर सभा!*
*(जाहीर सभेला आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी रामभाऊ सातपुते राजन पाटील माजी आमदार यशवंत तात्या माने जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, नागनाथ भाऊ क्षीरसागर व सुशील भैया क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती)*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
मोहोळ नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने प्रभाग क्र. 3 व 5 चे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष मा. सचिन (दादा) कल्याणशेट्टी व माजी आमदार मा. राम (भाऊ) सातपुते यांची जाहीर सभा संपन्न होणार आहे.
ही सभा पंचायत समिती माजी सभापती मा. शहाजन (मालक) शेख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या सभेला माजी आमदार मा. राजनजी (मालक) पाटील, माजी आमदार मा. यशवंत (तात्या) माने, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा. शशिकांत (नाना) चव्हाण, जेष्ठ नेते मा. नागनाथ (भाऊ) क्षीरसागर, मा. बाळासाहेब (भाऊ गायकवाड, मा. शैलेश (दादा) गरड, मा. नागनाथ (मामा) सोनवणे, मा. सुरेश राऊत (सर), मा. सतीश (आप्पा) काळे, मा. सोमेश (आबा) क्षीरसागर, मा. मुजीब मुजावर, लोकनियुक्त नगराध्यक्ष भाजपा अधिकृत उमेदवार सौ. शीतल सुशिल क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या सभेसाठी मोहोळ तालुका व शहर भाजपा सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, ही विनंती.
