*हंगाम २०२६-२७ साठी दामाजी कारखान्यावर रोलर पूजन समारंभ संपन्न!*
*
*(श्री गोंडाप्पा बिराजदार व श्री महादेव लुगडे या संचालकांना मिळाला रोलर पूजनाचा मान)*
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ गळीत हंगामासाठी रोलर पूजनाचा कार्यक्रम १५ आॅगस्ट २०२६ रोजी कारखान्याचे चेअरमन श्री।शिवानंद पाटील यांचे शुभहस्ते व व्हा।चेअरमन श्री।तानाजीभाऊ खरात यांचे अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला। सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक श्री गौडाप्पा गोविंद बिराजदार व श्री महादेव सखाराम लुगडे यांचे हस्ते रोलरचे पुजन करण्यात आले।
सदर प्रसंगी बोलताना कारखान्याचे चेअरमन श्री।शिवानंद पाटील म्हणाले की, तालुक्यातील शेतक-यांनी या संचालक मंडळावर विश्वास ठेवून अडचणीत असलेली ही संस्था आमच्या ताब्यात दिल्याने संचालक मंडळानेही विश्वासास पात्र राहून काम केले आहे। कारखान्याचे व्हा।चेअरमन श्री।तानाजीभाऊ खरात व संचालक मंडळ यांचे सहकार्याने नियोजन करुन सभासद शेतक-यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे ऊसास दर दिलेला आहे। कारखान्याने मागील चार वर्षे स्पर्धेत राहून एफ।आर।पी।पेक्षा जास्त ऊस दर वेळेत देण्याचे काम केले आहे। याशिवाय कामगारांचा फंड वेळचे वेळी भरुन पगारही प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेच्या आत दिले आहेत। दामाजी कारखाना सभासदांच्या मालकीचा राहिला पाहिजे ही भूमिका आम्ही ठेवून काम करीत आहोत। दामाजी कारखान्यासाठी कामगारांचेही योगदान मोठे राहिले आहे। सभासद शेतक-यांचा या कारखान्यावर विश्वास असल्यानेच विद्यमान संचालक मंडळ गेली चार गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडू शकले आहेत याचा सार्थ अभिमान आहे। यापुढेही हा कारखाना स्पर्धेत टिकला पाहिजे यासाठी संचालक मंडळाचा प्रयत्न रहाणार आहे।
येणा-या सन २०२६-२७ गळीत हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात अत्यल्प पाऊस झालेमुळे ऊसाची वाढ झालेली नसुन ऊस क्षेत्रही घटले आहे। त्यामुळे येणारा हंगाम सुरु करणेसाठी ऊसाची अडचण असली तरी कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी यांची कारखान्यावर असणारी निष्ठा व विश्वास यामुळे कारखाना व्यवस्थापनाने ४।०० लाख ऊस गळीताचे उध्दि्ष्ठ ठेवले आहे। गळीतास येणाÅया ऊसासाठी इतर कारखान्याच्या बरोबरीने व वेळेत ऊसदर देणार असले बाबतचा विश्वास चेअरमन श्री।शिवानंद पाटील यांनी यावेळी व्यक्त केला। गाळप हंगामासाठी परिपुर्ण अशी सर्व तोडणी वाहतुक यंत्रणा भरती केली आहे। याशिवाय दामाजी कारखान्यावर कोणताही उपपदार्थ निर्मिती प्रकल्प नसताना ऊस पुरवठा करणाÅया सभासद शेतकÅयांचे विश्वासावर कारखाना पुर्ण क्षमतेने चालु आहे। दामाजी कारखान्याचा वजनकाटा चोख असलेबाबत सोलापुर जिल्हयात नावलौकिक असलेचे सभासद शेतकÅयांमधुन वारंवार बोलले जाते।
येणा-या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कामगार यांनी असेच सहकार्य यापुढेही करावे व येणा-या गळीत हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून उच्चांकी गाळप करणेसाठी सहकार्य करावे असे आवाहन श्री शिवानंद पाटील यांनी केले।
सदर प्रसंगी कारखान्याचे व्हा।चेअरमन श्री।तानाजीभाऊ खरात, संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, प्रथमेश पाटील, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, कार्यकारी संचालक रमेश जायभाय, कारखान्याचे खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते।
