filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 41;
मायाक्कादेवी अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न !*
*(मायाक्कादेवी कृषी केंद्राचे मा.आमदार.दिपक आबा साळुंखे पाटील उद्योगपती मारूती माळी व धनाजी (भाऊ) बिचुकले यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न!)*
*(मी नेहमी कर्तृत्ववान तरुणांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असतो:- दिपक आबा साळुंखे पाटील)*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात विस्तारवाढ असलेल्या व सर्व गोरगरीब व दिनदलित कष्टकरी जनतेला सदैव मदतीचा हात देणारी म्हणून प्रसिद्ध असणारी मायाक्का देवी अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चौथ्या वर्धापन दिन कार्यक्रम अत्यंत उत्साही व आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाला.. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये भव्य अशा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सांगोला तालुक्यातील घेरडी येथील श्री मायाक्कादेवी अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या मुख्य शाखेमध्ये संपन्न झाला…
यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या मायाक्कादेवी कृषी केंद्राचे उद्घाटन माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, ब्रह्मा उद्योग समूहाचे प्रमुख मारुती माळी, व व धनाजी भाऊ बिचुकले यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.. या कार्यक्रमाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना दीपक आबा साळुंखे पाटील यांनी आम्ही सर्व नवतरुण होतकरू उद्योजकांच्या पाठीशी असून सर्व नवतरुण युवकांनी रोजगार निर्मितीकडे वळले पाहिजे. त्याचबरोबर नवनवीन संकल्पना राबवून, सर्व तरुणांनी रोजगार निर्मितीकडे वळावे त्याचबरोबर कर्तुत्वान माणसाच्या पाठीवर हाणणे, हे माझ्यासारख्या माणसाचे कामच आहे… *”मध्यंतरी थोडी वेगळी वाढ झाली होती पण आता गडी जरा लाईन वर आला आहे” खरे बघायला गेले तर शहाजी बापूंनी यायला पाहिजे होते पण यांचा सारखा माझ्याकडे अट्टाहास होता”* त्यामुळे माझ्या सर्व बैठका रद्द करून मी कार्यक्रमाला उपस्थित राहिलो असून, यामुळे मलाही माझ्या सर्व लोकांची यानिमित्ताने भेटता येते.. असेही प्रतिपादन दीपक आबा साळुंखे पाटील यांनी यावेळी केले.
यावेळी ब्रह्मा उद्योग समूहाचे प्रमुख उद्योगपती मारुती माने यांनी गावातील सर्व नवतरुण युवकांना रोजगार निर्मिती कशा पद्धतीने करावी काय त्यातले घटक आहेत काय केल्यानंतर काय होते आणि काय नाही त्याचबरोबर छोट्या उद्योगातून मोठ्या उद्योगाकडे कसे ओळखा येते. याबाबतचे चांगल्या पद्धतीने सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचा सन्मान मायाक्कादेवी उद्योग समूहाचे प्रमुख चेअरमन श्रीनिवास मधुकर करे यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी गावातील प्रतिष्ठित मान्यवर नेते मंडळी सर्व भागातील चेअरमन श्रीनिवास करे यांच्यावर प्रेम करणारे सर्व त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…
