
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यांवर दि १५ रोजी अनेक कार्यक्रमाचा शुभारंभ!!!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण!
(जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार राहणार कार्यक्रमाला उपस्थित!!)
सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते, सहकार तपस्वी, सहकार महर्षी, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ व कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या श्रीपुर १० हजार मेट्रिक टन विस्तारीकरण गाळप क्षमतेचा, व पोटॅश निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीससाहेब व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते दिनांक १५ आक्टोबर रोजी संपन्न होणार आहे…. या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील कृषीमंत्री दत्तात्रय मामा भरणे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील खासदार प्रणिती ताई शिंदे खासदार धैर्यशील मोहिते पाटील याचबरोबर जिल्ह्यातील तमाम सर्व आमदार सर्व साखर कारखान्याचे चेअरमन याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या अनावरण व शुभारंभ या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम ठीक दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी होणार असून माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील कारखाना कार्यस्थळावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी यांनी दिली आहे..
