*विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे कामगारांना दिवाळी बोनस व बक्षिस पगार अदा:-
( १५ ऑक्टोबर रोजी ऊस गावात हंगामाचा शुभारंभ मा. प्रशांत मालक परिचारक यांच्या शुभहस्ते)
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथील अधिकारी व कर्मचारी यांना सन 2025 चे दिवाळी सणासाठी 8.33 टक्के प्रमाणे बोनस व पंधरा दिवसाचा बक्षिस पगार अदा करणेत आला असल्याची माहीती संस्थापक चेअरमन मा.आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना मा.आ.बबनराव शिंदे म्हणाले की, कोणत्याही उद्योगाच्या प्रगतीमध्ये कामगार हा महत्वाचा घटक आहे. कारखान्याचे प्रगतीमध्ये अधिकारी व कर्मचारी यांचा मोठा सहभाग असून कारखान्याचे व्यवस्थापनाने युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथील अधिकारी व कर्मचारी यांना सन 2025 चे दिवाळी सणासाठी 8.33 टक्के प्रमाणे बोनस देणेचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बोनसची रक्कम अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्यात आली असून कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांना 15 दिवसाचा पगार बक्षिस म्हणून अदा करण्यात आला आहे. तसेच कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांना सालाबादप्रमाणे दिवाळी सणासाठी सभासद सवलत दराने साखर वाटप केली जाणार आहे. कारखान्यामार्फत कामगारांसाठी सातत्याने कल्याणकारी योजना राबविणेत येत आहेत. त्यामुळे कारखाना व व्यवस्थापन यांचेमध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित झालेले आहेत.
पुढील सन 2025-26 चा ऊस गाळप हंगाम शासनाचे धोरणानुसार सुरू होणार असून सन 2025-26 गळीत हंगामाचे ऊस गळीताचे उदिष्ठपुर्तीसाठी सभासद,अधिकारी कर्मचारी, ऊस तोडणी मजूर व वाहन मालक यांनी सहकार्य करावे असे आवाहन संस्थापक चेअरमन मा.आ.बबनराव शिंदे यांनी केले.

