
घेरडी गटातून श्रीनिवास मधुकर करे यांची जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी!
(सामाजिक बांधिलकी जपत समाजकारणाच्या माध्यमातून राजकारण करणारे एक युवा नेतृत्व म्हणजे श्रीनिवास मधुकर करे)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
आगामी एक महिन्यावर येऊन ठेपलेल्या सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघातील अत्यंत महत्त्वाचे अशा समजल्या जाणाऱ्या घेरडी जिल्हा परिषद गटामध्ये सर्व राजकीय नेते मंडळींनी पूर्वतयारी सुरू केली असताना मायाक्कादेवी पतसंस्थेचे युवा नेते ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास मधुकर करे यांनी सुद्धा घेरडी जिल्हा परिषद गटामध्ये मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे.. यामध्ये प्रामुख्याने त्यांनी घेरडी जिल्हा परिषद गटातील सर्व गावांमध्ये त्यांनी आपला जनसंपर्क वाढवला आहे. त्यांनी आजपर्यंत आपल्या सामाजिक कामाच्या माध्यमातून सर्व गोरगरीब दिनदलित व कष्टकरी जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.. श्रीनिवास मधुकर करे हे सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते मा.आमदार शहाजी बापू पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. ते घेरडी जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत. लवकरच दिनांक १३ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद निवडणुकीची आरक्षण सोडत निघणार असून त्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे..
