
वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये अनेकांनी केली मोर्चेबांधणी!
(मा आमदार बबनदादा शिंदे व चेअरमन रणजितभैया शिंदे यांच्याकडून नागेश उपासे हे युवा नेतृत्व उतरणार जिल्हा परिषदेच्या आखाड्यात)
(अनेक जण इच्छुक असले तरी प्रबळ दावेदारी मिळवण्यामध्ये कोण ठरणार सरस)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्याच्या अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या व खुल्या प्रवर्गासाठी राखीव असणाऱ्या वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये अनेकांनी आता जोरदार मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली असून, या वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये, दोन लोकसभा मतदारसंघाचा त्याचबरोबर तीन विधानसभा मतदारसंघातील गावांचा समावेश असून यामध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील वाखरी, कौठाळी शिरढोण, याचबरोबर सांगोला विधानसभा मतदारसंघातील खेड भाळवणी, शेळवे, भंडीशेगाव, या गावांचा समावेश असून सर्वात जास्त माढा विधानसभा मतदारसंघातील गावांचा या वाखरी जिल्हा परिषद गटांमध्ये समावेश आहे.. त्यामुळे साहजिकच या गटामध्ये सर्वात जास्त मतदान हे माढा विधानसभा मतदारसंघातील असून यामध्ये माजी आमदार बबनदादा शिंदे व सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीत भैय्या शिंदे व विद्यमान आमदार अभिजीत आबा पाटील, यांच्या दोन गटांमध्येच खरी लढत होणार असून, यामध्ये ऐनवेळी युवा नेते समाधान दादा काळे, यांची ही एन्ट्री होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.
माजी आमदार बबन दादा शिंदे यांच्या गटाकडून नागेश उपासे यांनी जोरदार मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली असून त्यांनी या जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावामध्ये आपला जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. तसेच नातेवाईक व मित्रमंडळींच्या संपर्कात राहून त्यांनी जिल्हा परिषद गटामध्ये मोठे, काम उभे केलेले आहे.. मागील अनेक वर्षापासून समाजकारण राजकारण व सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक सामाजिक उपक्रम नागेश उपासे यांनी केले असून या माध्यमातून त्यांनी अनेक गोरगरीब कष्टकरी व दीनदलित समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.. सर्व जाती धर्मातील लोकांमध्ये मिसळून प्रत्येक सण उत्सव व प्रत्येक सामाजिक कार्यक्रमांमध्ये मोठा सहभाग नागेश उपासे यांचा राहिला आहे. ते माढा विधानसभा मतदारसंघातील पटवर्धन कुरोली या गावचे असून अतिशय मनमिळावू व अतिशय शांत स्वभावाचे असलेले नागेश उपासे हे सर्व समाज घटकाला सोबत जाणारे नेतृत्व म्हणून उदयाला आलेले आहे.. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांनी जरी मोर्चेबांधणी केली असली तरी त्यांच्यासमोर बलाढ्य शक्तिशाली व आर्थिक बाजूने सधन असलेले अनेक मातब्बर नेतेमंडळी आहेत.. त्यातीलच एक नाव म्हणजे सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांची बंधू समाधान दादा काळे हे असून हे निश्चितच यावेळी सुद्धा आपले नशीब आजमावणार असल्याचे काही खात्रीला सूत्रांकडून समजत आहे.
या जिल्हा परिषद गटावर अनेक वर्षापासून पांडुरंग परिवाराचे वर्चस्व राहिले असून, पांडुरंग परिवारासोबतच मा आमदार बबनदादा शिंदे, व विठ्ठल परिवाराचे नेते माझी चेअरमन भगीरथ भालके यांचाही धबधबा या गटावर आहे..
त्याचबरोबर विद्यमान आमदार विठ्ठल चे चेअरमन अभिजीत आबा पाटील, यांच्या गटाकडूनही अनेक जण इच्छुक असून मोर्चेबांधणीला सुरुवात झालेली आहे..
१३ ऑक्टोबर रोजी दिवाळीपूर्वी आरक्षण सोडत निघणार असून त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.. या जिल्हा परिषद गटावर पांडुरंग परिवार, माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या गटातील कार्यकर्त्यांकडून दावेदारी जरी स्पष्ट होत असली तरी खरी लढत ही माजी आमदार बबनदादा शिंदे, व आमदार अभिजीत पाटील यांच्या गटातच होणार आहे…
