
संत दामाजी कारखाना विद्यमान चेअरमन व संचालक मंडळाने नावारुपाला आणला:-ह।भ।प। डॉ जयवंत बोधले महाराज
(नवीन जवळजवळ बारा हजार सभासद केल्यामुळे कारखान्याला इथून पुढे सोनेरी दिवस येणार आहेत:- चेअरमन शिवानंद पाटील)
(०३ वर्षाच्या कालावधीमध्ये चेअरमन व सर्व संचालक मंडळाने कारखाना काटकसरीने चालवून जिल्ह्यातील कारखानदारांमुळे आदर्श निर्माण केला आहे:- शिवाजीराव कांळुगे सर)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
मंगळवेढा दि।२२ सप्टेंबर,२०२५ ः- श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ सालच्या ३३ व्या बाॅयलर अग्निप्रदिपन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थितांना संबोधित करताना बोधले महाराज म्हणाले कि, साखर कारखानदारीमध्ये बाॅयलर अग्निप्रदिपन समारंभ म्हणजे एक पवित्र कार्य असते। कोणत्याही कामाची सुरुवात करताना हे अग्निप्रदिपनाचे सत्कर्म केले जाते। दामाजी कारखान्याला व मंगळवेढा तालुक्याला अध्यात्माचा स्पर्श झालेला आहे। माणसाने सत्कर्म करता आले नाही तर सत्कर्म करणा-याला सहकार्य करणे हे सुध्दा पुण्याचे कार्य आहे। फक्त एकत्र येण्याने चांगले काम होत नसते तर त्यासाठी एकरुप व्हावे लागते। असे एकरुप होऊन कारखान्याचे संचालक मंडळाने चांगले काम केले असल्याने दामाजी कारखाना या संचालक मंडळाचे कालावधीत नावारुपाला आला आहे। मागील तीन वर्षातील शेतक-यांची बिले,तोडणी वाहतुकदारांची बिले,कामगारांचे पगार,व्यापारी देणी या संचालक मंडळाने वेळेवर दिली आहेत। या हंगामाकरिता पाऊसपाणी चांगले झालेने हंगाम चांगल्या प्रकारे पार पडेल अशा शुभेच्छा व्यक्त करुन हा गळीत हंगाम यशस्वी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली।
बाॅयलर अग्निप्रदिपन समारंभानिमीत्त कार्यक्रमाच्या सुरुवातीला संचालक श्री औदुंबर वाडदेकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ।सुनिता औदुंबर वाडदेकर या उभयतांचे शुभहस्ते श्री सत्यनारायण पुजा व होमहवन करण्यात आले। कार्यक्रमानिमित्त सभेची अध्यक्षीय सुचना संचालक श्री बसवराज पाटील यांनी मांडली व अनुमोदन संचालक श्री दिगंबर भाकरे यांनी दिले। कार्यकारी संचालक श्री रमेश जायभाय यांनी उपस्थितांचे स्वागत करुन येणा-या हंगामात मा।संचालक मंडळाचे उध्दि्ष्ठाप्रमाणे गाळप करण्यास कारखान्यातील कर्मचारी कमी पडणार नसलेची ग्वाही सदर प्रसंगी दिली।
कारखान्याचे चेअरमन श्री शिवानंद पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले, तालुक्यातील जेष्ठ मंडळी यांनी मार्गदर्शन करुन संचालक मंडळावर विश्वास ठेवून चांगले सहकार्य केले आहे। स्व।मारवाडी वकील साहेब, स्व।रतनचंद शहा शेठजी, स्व।चरणुकाका पाटील यांच्या अथक परिश्रमातून या कारखान्याची निर्मीती झाली आहे। माजी आमदार प्रशांत पारिचारक, श्री भगिरथ भालके, प्रा।शिवाजीराव काळुंगे, राहुल शहा, रामचंद्र वाकडे, रामकृष्ण नागणे, दामोदर देशमुख, यादाप्पा माळी व तालुक्यातील इतर जेष्ठ मंडळीनी कारखान्याकरिता मार्गदर्शन व सहकार्य केल्यानेच गेले तीन हंगाम यशस्वीरित्या पार पाडले आहेत। प्रा।शिवाजीराव काळुंगे यांनी हा कारखाना माझा आहे या भावनेतून मदत केली आहे। राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मा।प्रशांतरावजी परिचारक यांचे माध्यमातुन एन।सी।डी।सी। कडुन कर्ज उपलब्ध करुन दिल्याने ब-याच बँकांचे थकीत कर्ज ओटीएस करुन कारखाना कर्जमुक्त करणेचे दृष्टीने महत्वाचे पाऊल उचललेले आहे। कारखान्याकडे कोणताही उपपदार्थ प्रकल्प नसताना आसपासच्या सर्व कारखान्यांचे बरोबरीने ऊस दर दिलेला आहे. नजिकचे काळात उपपदार्थ निर्मिती, कारखान्याची गाळप क्षमता वाढविणे यासाठी हे संचालक मंडळ प्रयत्नशिल आहे। सेवानिवृत्त कर्मचा-यांना पेन्शनचा लाभ चालु केला असुन त्यांची देणी टप्प्या-टप्प्याने देत आहे। तसेच मागील काळातील थकीत पगारही भविष्यकाळात देणेचा संचालक मंडळाचा मानस आहे। चालूवर्षी पाऊसकाळ चांगला झाला असलेने संचालक मंडळाने पाच लाख मे।टन ऊस गाळपाचे उद्षि्ट ठेवलेले आहे। दामाजी कारखान्यावर शेतक-यांचा विश्वास आहे। शिवाय कारखान्यातील कामगारही निष्ठेने काम करीत आहेत। यामुळेच येणारा गळीत हंगाम यशस्वी होणार असल्याचे त्यांनी सांगितले।निवडणुकीचे प्रचारावेळी कारखाना सभासदांच्या विचारांचा व मालकीचा राहिला पाहिजे हे वचन या संचालक मंडळाने दिलेले होते। त्याप्रमाणेच हे संचालक मंडळ कारभार करीत आहे। या संचालक मंडळाने ७/१२ उतारा असलेल्या १३ हजार शेतक-यांना सभासद करुन घेवून खुले सभासदत्व धोरण राबविले आहे। या गळीत हंगामामध्ये नोंदीप्रमाणेच ऊस गळीतास आणला जाणार आहे। शिवाय इतर कारखान्याच्या बरोबरीने ऊस दर देण्यास हे संचालक मंडळ बांधील राहणार आहे। तरी येणा-या हंगामाकरिता सभासद व शेतक-यांनी आपला ऊस दामाजी कारखान्याचे गळीतासाठी पाठवुन कारखान्याचे प्रगतीसाठी सहकार्य करावे असे आवाहन श्री।शिवानंद पाटील यांनी केले।
कार्यक्रमाचे अध्यक्षपदावरुन बोलताना धनश्री परिवाराचे मार्गदर्शक प्रा।शिवाजीराव काळुंगे बोलतांना म्हणाले, साखरेची आधारभूत किंमत रु।४०००/- पर्यंत वाढविणेबाबत सर्व साखर कारखानदारांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे। जेणेकरुन कारखानदारी पुढील अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे। सर्व संचालक मंडळ व कामगारांनी मिळून चांगले काम केले आहे। त्यामुळे हा गळीत हंगामही यशस्वीरित्या पार पडेल। सध्या स्त्री शक्तीचा जागर नवरात्र सुरु आहे। नारी शक्तीचा सन्मान करण्यासाठी ७/१२ उता-यावर व आपल्या नावापुढ आपल्या कुटुंबातील स्त्रीयांचे नांव लावणेचा संकल्प सर्वांनी करावा असे आवाहन शेवटी त्यांनी केले।
या कार्यक्रमास दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन अड।नंदकुमार पवार, कारखान्याचे व्हा चेअरमन श्री तानाजीभाऊ खरात, संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर यांचेसह मनोजकुमार ठेंगील, नामदेव जानकर, सचिन खरात, अशोक माळी, कल्याण रोकडे, शिवशंकर कवचाळे, दिगंबर शिंदे, महावीर ठेंगील, विजय बुरकूल, काशिनाथ पाटील, दत्तात्रय खडतरे, उत्तमराव घोडके, अभिमान बेदरे, शहाजी उन्हाळे, कलुबर्मे सर, किसन गवळी, रविंद्र पुजारी, विष्णू मासाळ, ज्ञानेश्वर भंडगे, प्रदिप पाटील, दुशासन दुधाळ, सुरेश पाटील, नानासोा मेटकरी, निखील पापरीकर, गुरुनाथ बुगडे, बंडोपंत बेदरे, राजू बाबर, राजेंद्र रणे, श्रीकांत सावळे, आप्पा लिगाडे, कारखान्याचे सर्व खाते प्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी, सभासद-शेतकरी, तालुक्यातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, वाहतूक ठेकेदार, कामगार संघटना व पतसंस्थेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.उपस्थितांचे आभार संचालक श्री भारत बेदरे यांनी मानले तर सुत्रसंचालन श्री अशोक उन्हाळे यांनी केले.
