
कोण होणार पेनुर जिल्हा .परिषदेचा. सिकंदर?
( मातब्बर नेतेमंडळी निवडून येणार का नव्या कार्यकर्त्याला संधी मिळणार)
(२०२४ च्या विधानसभा निवडणूक निवडणुकीची पुनरावृत्ती होणार का?)
आ.राजाभाऊ खरे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील व विजयराजदादा डोंगरे यांच्या त पॅचवर्क होणार का)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
कोविड साथीमुळे लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना शेवटी मुहूर्त लागला.गत पंचवार्षिक निवडणुकी पेक्षा यंदा मोहोळ तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलताना दिसतात.मागील निवडणुकीमध्ये श्री.राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरुद्ध खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखालील भीमा आघाडी यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली होती. मोहोळ पंढरपूर विधानसभा मतदारसंघा मध्ये जनतेने राजन पाटील यांच्या विचारांचे आमदार
श्री.यशवंत माने यांना मोठ्या मताधिक्याने नाकारत महाविकास आघाडीचे श्री.राजू खरे यांना यंदा विजयी केले आहे. राजन पाटील गटाशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद मिळवत मोहोळ तालुक्यामध्ये राजन पाटील विरोधी विचारसरणीच्या मंडळीना गोळा करत स्वतंत्र गट निर्माण करणारे श्री.उमेश पाटील त्यांच्या नवनिर्मित गटाची राजकीय ताकद स्वबळावर लढून आजमावणार का? राज्यसभेचे खासदार तसेच भीमा परिवाराचे सर्वेसर्वा खा. धनंजय महाडिक गट यंदा मोहोळ तालुक्यात राजन पाटील विरोधी नेते मंडळींची मूठ बांधण्यात यशस्वी होणार का?भीमा कारखाना मल्टिस्टेट सहकारी झाल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील इतर गट त्यांना परंपरेप्रमाणे साथ देणार का? मनोहर भाऊ डोंगरे समर्थक गट काय भूमिका घेणार? भारतीय जनता पक्ष स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवणार का? त्यांची स्वतंत्रपणे ताकद कुठपर्यंत आहे? भारतीय जनता पक्षाचे मोहोळ चे सर्व पदाधिकारी खासदार महाडीकांच्या नेतृत्वाखाली एकत्र येणार का? खासदार प्रणिती ताई शिंदे यांना एकट्या मोहोळ तालुक्यातून 60 हजार एवढं मताधिक्य दिल्यामुळे मोहोळ तालुक्यात सध्या काँग्रेस पक्षाची ताकद वाढलेली दिसते.त्यांच्या सक्षम नेतृत्वा खाली मोहोळ तालुक्यात नेहमीच डावलला गेलेला काँग्रेस पक्ष स्व बळावर ही निवडणूक लढवणार का? तर विधानसभेला शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मोहोळच्या जनतेने जनतेने 30000 च्या मताधिक्याने ज्यांना निवडून दिले परंतु हल्ली एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाशी जवळीकता दाखवतात या जहरी टीकेला बळी पडलेले आमदार राजू खरे महाविकास आघाडीसाठी सर्व पक्ष एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेणार का?खासदार प्रणितीताई शिंदे व वजनदार नेतृत्व आमदार राजू खरे यांचा समन्वय राहणार का? अनगरकरांचा समन्वय नक्की कुणाकुणा बरोबर होणार? महाविकास आघाडीचे नेमके कोण आणि महायुतीचे नेमके कोण हा गुंता सोडवण्यामध्ये मोहोळकरांचा उडालेला गोंधळ संपणार का? अकलूजच्या मोहिते पाटलांचे जुने कार्यकर्ते मोहोळ मध्ये मोठ्या संख्येने असल्यामुळे अकलूज करांचा हस्तक्षेप मोहोळ तालुक्यामध्ये होणार का ? विधानसभा निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतलेले शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्री.संजयअण्णा क्षीरसागर व तालुकाध्यक्ष विनय पाटील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या कार्यकर्त्यांना घेऊन काही नवं स्वतंत्र राजकीय समीकरण तालुक्याला देऊ शकतील का? राजन पाटील विरोधी विचार सरणीच्या गटांच्या वज्रमुठीचे नेतृत्व कोणाकडे राहणार? व ही वज्रमुठ किती बलशाली होणार? परंपरेप्रमाणे राजन पाटील विरोधी गट नेतृत्वांमध्ये समन्वय नाही झाला तर कोणती नवीन राजकीय समीकरणे पटलावर दिसणार? महाविकास आघाडीमध्ये समन्वय राहणार का? मोहोळ तालुक्यामध्ये महायुतीचे दोन तुकडे पडलेले सरळ सरळ दिसतात याचा फायदा उठवत महाविकास आघाडी मुसंडी मारणार का? महाविकास आघाडीच्या नेतृत्वाच्या “रथाचं” महायुतीकडून केलं जाणारं “सारथ्य” महाविकास आघाडीला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या जनतेला ते रुचणार का? की त्याविरुद्धचा रोश मतदानातून व्यक्त होणार ? त्याचा फटका नक्की कुणाला बसणार? आणि फायदा कोणाला होणार? या व यासारख्या अनेक प्रश्नांमुळे मोहोळ जि.प.पंचायत समिती निवडणूक चर्चेत आली आहे.
———–
1नं चौकट
मोहोळ मधील एकमेव खुल्या प्रवर्गासाठी असणाऱ्या पेनुर जिल्हा परिषद गटावर तालुक्या तील दिग्गज नेते मंडळींचा डोळा असलेला दिसून येतो. पेनुर व कुरूल हे दोन जिल्हा परिषद गट भीमा कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे भीमा कारखान्याचे 25 हजार सभासद येथील निवडणूक निकालामध्ये निर्णायक ठरतात. आमदार राजू खरे यांच्या विजयामध्ये भीमा कारखान्या च्या सभासदांचा सिंहाचा वाटा असून भीमा कारखान्याचे सभासदांची ताकद श्री.राजू खरे यांच्या मागे उभा करण्यामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावलेले टाकळी सिकंदर येथील सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा भीमा परिवाराचे संघटक समन्वयक प्रा.संग्राम चव्हाण यांचे नाव पेनुर जि. प.गटातील उमेदवारी साठी आघाडीवर आहे. गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे विविध प्रश्न त्यांनी शासन दरबारी उचलून धरल्यामुळे व निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह माईंडसेट घडवण्यासाठीचे कसब असणारे उच्चशिक्षित नेतृत्व असूनही आत्ता पर्यंत अनेक वेळा संधी डावलली गेल्यामुळे सुज्ञ मतदारांमध्ये प्रा.संग्राम चव्हाण यांच्या विषयी मोठी सहानुभूतीची एक लाट दिसत आहे. प्रा.संग्राम चव्हाण यांची उमेदवारी पेनुर जि. प. गटात सर्वांसाठी आव्हानात्मक ठरणार का? एक उच्चशिक्षित सरळ मार्गी,स्वच्छ चरित्र्याचे नेतृत्व म्हणून “विनिंग मेरिट”असलेला सुशिक्षित उमेदवार म्हणून काँग्रेस पक्ष त्यांच्याकडे पाहत असून ते शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी घेणार की काँग्रेस पक्षाकडून याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मोहोळ तालुका भारतीय जनता पक्षा कडून विद्यमान तालुकाध्यक्ष रमेश माने व मागील पंचायत समिती निवडणुकीमध्ये टाकळी सिकंदर पंचायत समिती गणातून श्री. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या विरोधात लढलेले भारतीय जनता पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष श्री. सुनील चव्हाण हे भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढण्या साठी फिल्डिंग लावणार का? मितभाषी आणि कामसू नेतृत्व म्हणून प्रसिद्ध असलेले पेनुरच्या सरपंच पदाचा धुरा यशस्वीपणे सांभाळलेले आणि भाजपाच्या वरिष्ठांच्या मर्जीतले असणारे श्री.रमेश माने यांची उमेदवारी तुल्यबळ ठरणार का? पेनुर हे गटातील सर्वात मोठे गाव असून येथील श्री.चरण राज चवरे हे शिवसेना पक्षाकडून तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटामधून श्री. रामदास चवरे श्री.प्रकाश चवरे तर उद्योगपती श्री.सागर चवरे हेही जि.प.उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत. भाऊभावकिच्या कुर घोड्यांना पुरून ऊरुन पेनुर मधून कोण बाजी मारणार? श्री. मानाजी माने तसेच त्यांचे चिरंजीव श्री. विक्रांत माने यांचे नाव चर्चेत असून राजन पाटील गटातून श्री.रामदास चवरे यांचे नाव आघाडीवर असल्यामुळे
“मामा भाचे” यापैकी कोणाच्या गळ्यात उमेदवारी ची माळ पडणार? त्यांना नक्की कोणत्या पक्षातून, गटातून संधी मिळणार याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.पंचायत समिती सदस्य असलेले श्री.ज्ञानेश्वर चव्हाण आता जि.प.साठी पेनुर लंगोट लावण्याचे धाडस करणार का ? भाऊ भावकीच्या शहकाटशहाला टाकळी सिकंदर गाव ही अपवाद नाही. पाटकुल चे “कॉमन मॅन” साठी झटणारे श्री.प्रभाकर भैया देशमुख हे होम पिचवर सामना खेळणार का? बघता बघता वातावरण होत्याचं नव्हतं करून दाखवण्यात हातखंडा असणारे भीमा परिवाराचे खासदार धनंजय महाडिक त्यांच्या ताकदीसह उतरल्यावर मोहोळ तालुक्याच्या राजकीय क्षितिजावर कोणकोणती नवी राजकीय समीकरणे उगवू शकतात? की कट शहाकटाचे राजकारण होणार या अनेक अफलातून प्रश्नांची उत्तरे मिळवत सर्व नेते मंडळी आपापल्या परीने पेनुर गटात अॅक्टिव्ह झालेली दिसत आहेत. पेनुर हा तालुक्यात एकमेव खुल्या संवर्गासाठी असणारा जिल्हा परिषद गट असल्यामुळे ज्यांना होमटाऊन मध्ये आरक्षणामुळे गटच राहिला नाही असे तालुक्यातील दिग्गज नेते पेनुर गटावर डोळा ठेवून असल्यामुळे पेनुर जिल्हा परिषद गटाचा सिकंदर कोण होणार याविषयी जनसामान्यात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. घोडा मैदान जवळ आहे जनता जनार्दन कोणाच्या पारड्यात किती वजन टाकणार हे नजीकचा भविष्यकाळ ठरवेल!
