
मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीची दक्षिण मंडलाची कार्यकारणी जाहीर!
(आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकारिणी जाहीर झाल्यामुळे मोहोळ दक्षिण मंडलामध्ये पदाधिकारी युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह)
( शशिकांत नाना चव्हाण व सरचिटणीस विकास वाघमारे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टी दक्षिण मंडल कार्यकारणी नुकती जाहीर करण्यात आले असून या कार्यकारणी मध्ये दक्षिण मंडलाचे तालुकाध्यक्ष रमेश लक्ष्मण माने यांनी सर्व आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा एका अपेक्षेनुसार एक कार्यकारणी जाहीर केले आहे या कार्यकारणी मध्ये सर्व नव्या व जुन्या पदाधिकाऱ्यांचा मेळ घालण्यात आला आहे हि नविन कार्यकारणी जाहीर केल्यामुळे ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आगामी निवडणुकीसाठी मोठा उत्साह संचारला आहे.. यामध्ये बऱ्याच अंशी जुन्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असून अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यामध्ये त्यांनी सामील केलेले आहेत.. भारतीय जनता पार्टीचे काम तळागाळातील सर्वसामान्य व गोरगरीब दिनदलित व कष्टकरी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी, भारतीय जनता पार्टीच्या वतीने ही कार्यकारणी जाहीर करण्यात आल्याचे मोहोळ दक्षिण मंडळाचे तालुकाध्यक्ष रमेश माने यांनी सांगितले.
या सदर निवडी प्रसंगी मोहोळ दक्षिण मंडल भाजपा कार्यकारणी भाजपा सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण व जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांच्या उपस्थितीमध्ये मोहोळ दक्षिण मंडल अध्यक्ष रमेश माने यांनी जाहीर केली
यावेळी मोहोळ उत्तर अध्यक्ष सतीश काळे,संजीव खिलारे , सचिव दादासाहेब थोलबोले ओढी,सौदागर खडके ,महेश सोहणी , दीपक पुजारी , अभिमन्यू शिंदे ,साहेबराव घोडके ,लिंगराज शेंडगे ,दिगंबर कांबळे, अतुल पवार, विशाल चौधरी ,आण्णासाहेब सलगर ,सागर भोसले , अमरनाथ सरवळे प्रमोद जाधव , सागर वाघमारे , हनुमंत सपाटे अमर पवार , कौस्तुभ डोळे,यशवंत नामदे , भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
*नविन कार्यकारणी सदस्य*
*सरचिटणीस माऊली नागनाथ भगरे (अंकोली)*
*संजयकुमार वाघमोडे सरचिटणीस (कामती बुद्रक)*
*हरीभाऊ काकडे उपाध्यक्ष ( घोडेश्वर)*
*गणेश रामचंद्र मुळे उपाध्यक्ष ( खंडाळी)*
*श्रीदेवी विजय काटे उपाध्यक्ष (पाटकुल)*
*तानाजी चन्नबस पाटील उपाध्यक्ष (शेजबाभळगांव)*
*विकास बाबासाहेब वसेकर उपाध्यक्ष (पाटकुल)*
*दादासाहेब थोरबोले सचिव (औंढी )*
*तानाजी लक्ष्मण पुजारी कोषाध्यक्ष (पेनुर)*
*अनुजा अभिनव लोखंडे अध्यक्षा महिला मोर्चा*
*दिपाली मारूती कोरे, सरचिटणीस महिला मोर्चा ( तरटगांव)*
*गणेश अज्ञान शिंदे अध्यक्ष ,किसान मोर्चा (औंढी )*
*विश्वास बापू गायकवाड अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा (टाकळी सिकंदर)*
*कोट*
*मोहोळ तालुक्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने दक्षिण मंडलामध्ये ही नवीन कार्यकारणी आम्ही जाहीर केली असून आगामी काळात राहिलेल्या उर्वरित मोर्चे प्रकोष्ट सेल व इतर सर्व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी वरिष्ठांच्या सहमतीने आम्ही लवकर जाहीर करणार आहोत*.
*रमेश माने*
*तालुकाध्यक्ष मोहोळ*
