
*(आगामी सर्व निवडणुकांमध्ये माळी समाजाला योग्य प्रतिनिधी मिळावे यासाठी लढा उभा करणार:- शंकरराव वाघमारे)*
*(पंढरपूर येथे माळी महासंघाचे राज्यस्तरीय चिंतन शिबिर संपन्न!)*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
राज्यात ओबीसी च्या लढ्यात संपूर्ण महाराष्ट्रातील माळी महासंघाचे सर्व पदाधिकारी सक्रिय राहून ताकतीने उतरतील असे प्रतिपादन माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भाऊ ठाकरे यांनी केले आहे.
पंढरपूर येथे संपन्न झालेल्या माळी महासंघाच्या राज्यस्तरीय चिंतन शिबिरात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे हे होते. राज्यातील सत्तावीस जिल्हामधून आलेल्या सर्व राष्ट्रिय पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष यांचे स्वागत माळी महासंघ किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष श्री शंकरराव वाघमारे यांनी केले.
यावेळी राज्यातील माळी समाजाची सद्यस्थिती, आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये माळी समाजाचे प्रतिनिधित्व, महाराष्ट्र शासनाने काढलेला जीआर रद्द करणे अथवा दुरुस्त करणे, याबाबत जनजागृती करणे, राज्यस्तरावर होणाऱ्या ओबीसीच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवणे, माळी महासंघाचा अधिक विस्तार करण्यासाठी प्रयत्न करणे आदी विषयावर सखोल चर्चा व चिंतन करण्यात आले, आणि निर्णय घेण्यात आले. आज देशामध्ये माळी समाजाचा एक मुख्यमंत्री, राज्यामध्ये माळी समाजाचे तीन मंत्री, अनेक आमदार, कार्यरत आहेत. जिल्हा परिषद , पंचायत समिती , ग्रामपंचायत, नगरपालिका , महानगरपालिका या निवडणुकांमध्ये समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावं यासाठी रणनीती ठरवण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय महासचिव रवींद्र जी आंबेडकर, प्रदेश सरचिटणीस नानासाहेब कांडलकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष काळुराम अण्णा गायकवाड, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष गायत्री ताई लडकत, सांगोल्याची माजी नगराध्यक्ष डॉक्टर प्रभाकर माळी, माजी जि प सदस्य हरिभाऊ गांवधरे, श्रीकृष्ण गोरडे प्रदेश कोषाध्यक्ष, चंद्रशेखरजी दरवडे , मुरलीधरजी भुजबळ , मुकुंदजी पोटदुखे , दीपक भाऊ जगताप पुणे, राजेशजी जावरकर , दिनेश टाकरखेडे , संतोष जमदाडे, रीमाताई लडकत आधी राज्यभरातून आलेले प्रमुख मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माळी महासंघ किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव वाघमारे, माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर जांभळे, विश्वस्त भारत माळी यांनी प्रयत्न केले . आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांची व्यवस्था संतोष नामदे, रमेश भानवसे, गोरख भानवसे , विकास वाघमारे , विजय राऊत , सचिन देशपांडे , आबा देवकर, शाम गोडसे यांनी केली. यावेळी उषाताई गोरे , वंदना देवकर, स्वातीताई गोरे , रेखाताई यादव, मीनाक्षी भाकरे , कुलदीप आहेरकर, राजाभाऊ भंडारे, दत्तात्रय जाधव, आदी उपस्थित होते.
