
१०८९ कुटुंबियांचा आर्थिक विकासाचा मार्ग मोकळा!
(आ.अभिजित आबा पाटील यांचा ऐतिहासिक निर्णय!)
(आजी-माजी संचालकानी सोडला सुटकेचा निःश्वास)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सन २०१६-१७मधील पाठीमागील संचालक मंडळाच्या काळात सभासद शेतकरी, कामगार व वाहतूक ठेकेदारांच्या नावावरील बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडिया बँकेच्या तब्बल १०८९ जणांची कर्ज थकले असताना त्यांचे सिबिल खराब झाल्याने त्यांना नव्याने कर्ज मिळत नव्हते..
बँकाशी सकारात्मक चर्चा करून आणि ‘वन-टाईम सेटलमेंट (ओटीएस)’ चा मार्ग काढत नीलदाखल्यांचे वाटप विठ्ठल कारखान्यावर करण्यात आले. आता १०८९ जणांना पुन्हा बँक कर्ज मिळणार असून, त्यांच्या भविष्यास नवी दिशा मिळाली आहे..
इतकेच नव्हे तर; पुन्हा त्याच बँका वाहतूकदार, शेतकरी आणि कामगारांना कर्ज देतील अशी अट्ट टाकण्यात आली, कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करणार नाहीत, इथून पुढे सुरळीत व्यवहार करतील असा शब्द दिला..
सहकार क्षेत्र हे आर्थिक उन्नतीसाठी असते, हे स्व.औदुंबर अण्णांचे तत्व होते. पण तत्कालीन व्यवस्थापनाने केलेल्या निर्णयांमुळे या कुटुंबांची आर्थिक प्रगतीच खुंटली होती. निवडणुकीपूर्वी या कुटुंबांना शब्द दिला होता, अविरत पाठपुराव्यानंतर अखेर मार्ग निघाला, याचा मनस्वी आनंद वाटतो.
यात श्रेय माझ्या एकट्याचे नसून औदुंबरआण्णांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन काम करणाऱ्या कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि सभासदांची मोलाची साथ दिली, याच साथीवर आणि पाठबळावर तीन गळीत हंगाम यशस्वी करू शकलो, इथून पुढेही अशीच आपली मोलाची साथ रहावी..
