
नरखेड व मंडलामध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करावेत:- संतोष आण्णा पाटील
(पालकमंत्री जयकुमार गोरे यांना, संतोष अण्णा पाटील यांच्याकडून निवेदन सादर)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यात विशेषतः मोहोळ तालुक्यात व नरखेड मंडलामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे विशेषता सोयाबीन कांदा व तूर इत्यादी पिकांचे पावसामुळे अतोनात नुकसान झालेले आहे. हे नुकसान इतके प्रचंड आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये नरखेड मंडळामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे यामुळे कोट्यावधी रुपयांच्या शेतमालाचे नुकसान झाले असल्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ यांना भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य, माजी जिल्हाध्यक्ष संतोष अण्णा पाटील यांनी सदर मागणीचे निवेदन सादर केले आहे. यावेळी संतोष अण्णा पाटील यांच्यासोबत सरपंच बाळासाहेब मोटे, आकाश पाटील विजयसिंह दगडे, खंडू खंदारे त्याचबरोबर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते…
