
*प. कुरोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या(चिंचकर वस्ती) येथील विद्यार्थ्यांना स्टीलचे डब्याचे वाटप!*
*राहुल सर्जे यांचा लक्ष्मण तात्या धनवडे यांच्या वाढदिवसानिमित्त पटवर्धन कुरोली येथे स्तुत्य उपक्रम!!!*
*(संचालक लक्ष्मण तात्या धनवडे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेणारा पटवर्धन कुरोलीतील राहुल सर्जे एकमेव)*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे राज्य परिषद सदस्य तथा पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक व सोलापूर जिल्हा भाजपा ओबीसी सेल चे दिनदलीत गोरगरीब व कष्टकरी जनतेचे कैवारी मार्गदर्शक लक्ष्मण तात्या धनवडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पटवर्धन कुरोली येथील चिंचकर वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे च्या विद्यार्थ्यांना जवळजवळ ५० स्टीलच्या डब्यांचे वाटप बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना घरून जेवण बनवून आणण्यासाठी जी गैरसोय होत होती. ती दूर करण्यासाठी लक्ष्मण तात्या धनवडे यांचे खंदे समर्थक राहुल सर्जे यांनी हा स्तुत्य उपक्रम घेतल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे..
या कार्यक्रमाप्रसंगी,यावेळी धनाजी बोबडे गुरुजी,मारुती कोळसे, रमेश नाईकनवरे, भगवान नाईकनवरे, प्रशांत मलशेट्टी, अंकुश जवळेकर, प्रसाद नाईकनवरे, निलेश गवळी, संतोष कोळसे इतर उपस्थित होते…
