
शहरातील कचऱ्याच्या समस्येवर पालकमंत्र्यांची झडती
(अचानक पाहणीत कचऱ्याचे ढीग पाहून पालकमंत्र्यांचा संताप; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
शहरातील वाढती अस्वच्छता आणि जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग यावर पालकमंत्री ना. जयकुमार भाऊ गोरे यांनी सकाळी अचानक झडती घेतली. त्यांच्यासोबत आमदार देवेंद्र दादा कोठे, भाजपा शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर, महिला मोर्चा अध्यक्षा रंजीताताई चाकोते, मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने आदी मान्यवर उपस्थित होते.
बेडर पूल, सिद्धार्थ चौक आणि 14 नंबर शाळा,नळबाजार चौक ,नवले नगर या भागात पालकमंत्री पाहणी करत आहेत
पाहणीदरम्यान शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पडलेला कचरा, उघडे नाले आणि अस्वच्छता पाहून पालकमंत्री संतापले. त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना तात्काळ स्वच्छता मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या.
*कोट*
*“स्वच्छ सोलापूर हे आपलं स्वप्न आहे. नागरिकांच्या आरोग्यास धोका पोहोचेल अशी परिस्थिती आम्ही कदापिही सहन करणार नाही,” — पालकमंत्री जयकुमार गोरे*
