
दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन – डॉ. विशाल बाबर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी, स्वामी चिंचोली यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२३ ऑगस्ट २०२५ रोजी “Emerging Trends in Pharmaceutical Research and Health Science” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद यशस्वीरीत्या पार पडली.
या परिषदेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. गणेशजी दामा, BOS Chairman, फार्मसी विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,प्रा. रामदास झोळ, संस्थापक अध्यक्ष, दत्तकला शिक्षण संस्था, व प्राचार्य डॉ. जॉन डिसूझा यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी सौ. माया झोळ, सचिव, दत्तकला शिक्षण संस्था, यांचीही विशेष उपस्थिती होती.
डॉ. गणेशजी दामा यांनी शैक्षणिक धोरणे व संशोधनातील नवसंधी यावर मार्गदर्शनपर भाषण केले. शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील संशोधनाचे महत्व स्पष्ट करत परिषदेला विशेष मार्गदर्शन दिले.
प्रा. रामदास झोळ यांनी आपल्या भाषणात शैक्षणिक संस्थांनी उद्योग, संशोधन व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या उपक्रमांचे महत्त्व तसेच औषधनिर्माणशास्त्रातील नवीन संशोधन, आरोग्यविज्ञानातील वाढते आव्हान, आणि शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले.
परिषदेमध्ये Resource Person म्हणून दोन मान्यवर तज्ज्ञांनी आपले सखोल विचार मांडले:
डॉ. जॉन डिसूझा, प्राचार्य, SYBES’s Bombay Institute of Pharmacy and Research, मुंबई, यांनी “New Trends in Pharmacy” या विषयावर सखोल व्याख्यान दिले. त्यांनी औषधनिर्मिती क्षेत्रातील जागतिक स्तरावर होत असलेल्या नवकल्पना, आधुनिक संशोधन पद्धती, आणि विद्यार्थ्यांनी या नवप्रवृत्तींशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक कौशल्यांवर प्रकाश टाकला.
श्री. सारंग साळुंखे, संचालक, 3S Analytical Technology, पुणे, यांनीही “नवीन औषध विश्लेषण तंत्रज्ञान” आणि उद्योग-शिक्षण दुव्याच्या महत्त्वावर माहितीपूर्ण सादरीकरण केले.
या परिषदेमध्ये विविध भागातून आलेल्या प्राध्यापक, संशोधक, औद्योगिक तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. परिषदेमध्ये विविध विषयांवरील सत्रांमध्ये खालील मुद्द्यांवर चर्चा झाली:
औषध संशोधनातील नवप्रवृत्ती
नैसर्गिक व पारंपरिक औषधांचे वैज्ञानिक मूल्यमापन
आरोग्यविज्ञानातील तंत्रज्ञान व डिजिटल हेल्थ इनोव्हेशन
फार्माकोव्हिजिलन्स व क्लिनिकल रिसर्चमधील संधी
विद्यार्थ्यांसाठी पोस्टर आणि रिसर्च पेपर सादरीकरणाची स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. निवडक उत्कृष्ट सादरीकरणांना प्रमाणपत्रे व पारितोषिके प्रदान करण्यात आली.
सौ. माया झोळ सचिव दत्तकला शिक्षण संस्था यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पडला. पोस्टर सादरी करण प्रकारात प्रथम पारितोषिक धनश्री प्रकाश सोनवणे, डी. वाय.पाटील कॉलेज ऑफ फार्मसी आकुर्डी पुणे यांनी पटकविले, तर द्वितीय विभागून अनुक्रमे आर्या सुर्यकांत अडसूळ व बुशरा बापू शेख दोघीही दत्तकला इन्स्टिटयूट ऑफ फार्मासुटिकल सायन्स अँड रिसर्च, स्वामी चिंचोली व तृतीय विभागून अनुक्रमे यशोदा सखाराम होलगीर, दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी व अमन इलाही शेख, बारामती कॉलेज ऑफ फार्मसी यांनी पटकविले.
डॉ. विशाल बाबर, दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी, यांनी परिषदेचे प्रभावी संयोजन केले. त्यांनी सांगितले की, “ही परिषद विद्यार्थ्यांना नव्या दृष्टीकोनात संशोधन व उद्योगाशी संबंधित ज्ञान देणारी ठरली.”
या परिषदेसाठी डॉ. जितेंद्र कांदळे, डॉ. हरिबा जेडगे, डॉ. ज्ञानदेव गाढवे, आणि प्रा. तेजस्विनी अडसूळ यांचे विशेष योगदान राहिले. त्यांनी परिषदेसाठी नियोजन, सत्रांचे संयोजन व सहभागींच्या समन्वयाचे कार्य अत्यंत प्रभावीपणे पार पाडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहल दुरंदे यांनी प्रभावीपणे केले, तर डॉ. के. श्रीकांतकुमार यांनी उपस्थित सर्व मान्यवर, resource persons, आयोजक व सहभागींचे मन: पूर्वक आभार मानले. परिषद यशस्वीपणे पार पडल्याबद्दल आयोजकांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
