
तालुकाध्यक्ष रमेश माने यांच्या अथक प्रयत्नानंतर पेनुर येथील पेनुर ते बनाचा ओढा या ठिकाणी असलेल्या रस्ता पूर्ण दुरुस्ती करून सुरू!
(बनाचा ओढा ते पेनुर येथील रहिवाशांचा बऱ्याच वर्षाचा प्रश्न रमेश माने यांच्यामुळे मार्गी)
पेनुर जिल्हा परिषद गटातील अतिशय महत्त्वाचे असलेल्या पेनुर येथील बनाचा ओढा ते पेनुर या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती या ठिकाणी असलेल्या अनेक लोक वसाहती मधील लोकांना व वाड्यावर त्यावरील लोकांना पेनुर व आसपासच्या भागांमध्ये जाण्यासाठी अत्यंत जिकरीचे झाले होते.. हा रस्ता म्हणजे एक प्रकारे मृत्यूचा सापळा बनला होता.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर या रस्त्यावरून येणे जाणे महा कठीण झालेले असताना तात्काळ या रस्त्यासाठी मोहोळ दक्षिण मंडलाचे तालुकाध्यक्ष रमेश माने यांनी तात्काळ या ठिकाणी लक्ष घालून या रस्त्यावर मुरूम टाकून हा रस्ता मुरमीकरण करून देऊन तेथील लोक वस्तीवरील रहिवाशांची अनेक वर्षाची मागणी चुटकीसरशी पूर्ण केली. यासाठी त्यांनी अथक प्रयत्न व मेहनत घेऊन हा रस्ता पूर्ण केला असून, यासाठी त्यांना पेनुर ग्रामपंचायतचे सदस्य लक्ष्मण चवरे, व युवा नेते अजित वाघमोडे यांनी महत्त्वाची साथ दिली आहे…
याबाबत येथील रहिवाशांनी रमेश लक्ष्मण माने यांच्या आभार मानले असून अनेक वर्षाचा प्रलंबित राहिलेला प्रश्न मार्गी लावल्यामुळे येथील सर्व रहिवासी समाधानी आहेत..
