
‘मी अतुल्य’ ॲपद्वारे अभ्यास होणार सुकर; खासदार धनंजय महाडिक यांचा अभिनव उपक्रम
ग्रामीण विद्यार्थी अत्याधुनिक तंत्रज्ञानात व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये व त्यांच्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी या हेतूने राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून मोहोळ व पंढरपुर तालुक्यातील एकूण 9 शाळांमध्ये मी अतुल्य अँपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शाळेत दिलेला गृहपाठ व जास्तीचा अभ्यास मोबाईलद्वारे घरीच करता येण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मी अतुल्य ॲपची मदत होणार आहे. शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण योगदान देणाऱ्या सातारा जिल्ह्यातील प्राची मोरे यांच्या के टू पी सोल्युशन्सने या ॲपची निर्मिती केली आहे. या ॲपद्वारे मराठी माध्यमातील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास गृहपाठ तसेच पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करता येतो. शिष्यवृत्ती परीक्षेच्या तीन हजाराहून अधिक सराव प्रश्नपत्रिका या ॲपद्वारे सोडविता येतात.
मोहोळ व पंढरपुर तालुक्यातील सरस्वती विद्यालय, टाकळी सिकंदर, जि.प.प्रा. केंद्र शाळा पुळूज, जि.प.प्रा. शाळा भानुदास नगर, लिंगेश्वर विद्यालय पुळूज, जि.प.प्रा. शाळा फुलचिंचोली, राजीव गांधी विद्यालय फुलचिंचोली, जि.प.प्रा. शाळा सुस्ते, जि.प.प्रा. शाळा(चोरमाळ) सुस्ते व दत्त विद्या मंदीर सुस्ते अशा 9 शाळांमध्ये एकुण 1300 विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
