
प्रा.रामदास झोळ सर यांच्या करमाळा संपर्क कार्यालयास भाजपा सरचिटणीस नितीन झिंजाडे यांची सदिच्छा भेट!
(दत्तकला शिक्षण संस्थेच्या व झोळ सरांच्या वतीने नितीन झिंजाडे यांचा सन्मान)
करमाळा तालुका भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस नितीन झिंजाडे यांनी आज करमाळा शहरातील दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे नेते प्राध्यापक रामदास झोळ सर यांच्या संपर्क कार्यालय सदिच्छा भेट दिली..
यावेळी नितीन झिंजाडे व व दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ यांच्यामध्ये विविध राजकीय विषयावर सविस्तर चर्चा झाली. याप्रसंगी प्राध्यापक रामदास झोळ सर यांच्या वतीने भाजपा सरचिटणीस नितीन झिंजाडे, यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला..
यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय जगदाळे, मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक हरिभाऊ झिंजाडे, दत्तात्रय वाळुंजकर, प्राध्यापक रामदास झोळ सर यांचे स्वीय सहाय्यक गोपीनाथ पाटील, नितीन सरडे, तात्यासाहेब सरडे दिलीप गुटाळ याचबरोबर असंख्य कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते…